मुंबई : १५ ऑगस्ट रोजी भारतीय बाजारात नवनवीन प्रोडक्ट (product) लॉन्च करण्याची पद्धत आहे, खासकरुन ऑटोमोबाईल (Automobile) क्षेत्रात नवीनवीन कार, बाईक्स, एसयूव्ही (Car, bike and SUV) आदी पाहयाला मिळते, तसेच सणासुदीच्या काळात सुद्धा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या वेगवेगळी शक्कल लढवताना दिसतात, दरम्यान, ओला इलेक्ट्रिक कंपनी (Ola Electric Company) याआधी टू व्हिलर बाईक लॉन्च केली आहे. (Two wheeler bike launch ) गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी ओलानं आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली होती. त्यामुळं आता पुन्हा एकदा १५ ऑगस्ट औचित्य साधत ओला इलेक्ट्रिक कंपनी भारतीय बाजारात आता आणखी एक टू व्हीलर स्कूटर लॉन्च करणार आहे.
[read_also content=”नितीश कुमार ज्या मार्गावर चालले आहेत, त्याला राजकारणातला उध्दव मार्ग म्हणतात – चित्रा वाघ https://www.navarashtra.com/maharashtra/nitish-kumar-political-way-to-that-called-udhav-way-bjp-chitra-wagh-314418.html”]
दरम्यान, ओला इलेक्ट्रिक कंपनी आपल्या नव्या स्कूटरला Greenest EV असं म्हटलं आहे. कंपनीनं आपल्या सोशल मीडिया हँडलवरुनही (Social media) नव्या स्कूटरबाबत माहिती दिली आहे तसेच तारीखही जाहीर केली आहे. ओलाची नवी स्कूटर ओला एस-१ (ola s1) च्या तुलनेत जास्त फिचर्स आणि रेंजसह लॉन्च होणार आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार या बॅटरीमध्ये स्कूटर एकदा चार्ज केली केली की १८१ किमीची रेंज देईल. ओला एस वन प्रोची टॉप स्पीड ११५ किमी प्रतितास इतकी आहे. ओला एसटीडीची किंमत ९९,९९९ रुपये इतकी आहे. तर ओला एस१-प्रोची किंमत १,३९,९९९ रुपये इतकी आहे. त्यामुळं ज्यांना नवीन बाईक खरेदी करायची आहे, त्यांच्यासाठी ओला इलेक्ट्रिक कंपनी आपल्या नव्या स्कूटरचा पर्याय उत्तम ठरु शकतो.