फोटो सौजन्य: @BMWMotorradJPN/ X.com
भारतात हाय परफॉर्मन्स बाईकचा एक वेगळाच चाहतावर्ग आहे. एकीकडे जिथे बजेट फ्रेंडली बाईकची विक्री जास्त होताना दिसत असली तरी मार्केटमध्ये हाय परफॉर्मन्स बाईकला सुद्धा चांगली मागणी मिळते. या बाईक दिसण्यात तर स्टायलिश असतातच मात्र त्या परफॉर्मन्समध्ये सुद्धा पॉवरफुल असतात. भारतात अनेक कंपन्या आहेत, ज्यांनी बेस्ट परफॉर्मन्स बाईक ऑफर केल्या आहेत. अशीच एक कंपनी म्हणजे BMW.
बीएमडब्ल्यू मोटाराडने त्यांची लोकप्रिय स्ट्रीटफायटर बाईक 2025 BMW S 1000 R भारतात लाँच केली आहे. कंपनीने याची किंमत 19.90 लाख रुपये (एक्स-शोरूम, भारत) आहे. यासोबतच, डिझाइन आणि मेकॅनिकल दोन्ही पातळीवर यामध्ये मोठे अपडेट्स देण्यात आले आहेत. या बाईकचे फीचर्स आणि इंजिन डिटेल्स सविस्तरपणे जाणून घेऊया.
ही नवीन S 1000 R बाईक 999cc, लिक्विड कूल्ड, 4-सिलेंडर इंजिनने सुसज्ज आहे. जी 11,000 RPM वर 170bhp पॉवर आणि 9,250 RPM वर 114Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कंपनीचा दावा आहे की ही बाईक फक्त 3.2 सेकंदात 0-100 किमी प्रतितास स्पीडने धावते. या बाईकचा टॉप स्पीड 250 किमी प्रतितास आहे.
या बाईकच्या फीचर्स आणि टेक्नॉलॉजीबद्दल बोलायचे झाले, तर यात हेडलाइट प्रो (Headlight Pro) सोबत डे-टाईम रनिंग लाईट्स, M क्विक अॅक्शन थ्रॉटल, मल्टिपल रायडिंग मोड्स, ABS प्रो आणि डायनॅमिक ट्रॅक्शन कंट्रोल मिळते. यामध्ये 6.5-इंच TFT डिस्प्ले (कनेक्टिव्हिटी व नेव्हिगेशन सपोर्टसह), E-Call इमर्जन्सी फीचर तसेच सीटखाली USB Type-C चार्जिंग पोर्ट देखील दिलेला आहे.
बाईकचा लूक खूपच आकर्षक ठेवण्यात आला आहे. ही बाईक शार्प टँक एक्सटेंशन, एक्सपोज्ड सबफ्रेम आणि मस्क्युलर फ्युएल टँकसह येते. या सर्वांमुळे, ही बाईक ट्रॅक रेडी आणि स्ट्रीट-फायटर फील देते.
Hero Splendor Plus की Bajaj Platina, जीएसटी कमी झाल्यानंतर कोणती बाईक जास्त स्वस्त?
बीएमडब्ल्यूने ही बाईक तीन पॅकेज पर्यायांसह लाँच केली आहे. यात डायनॅमिक पॅक, कम्फर्ट पॅक आणि एम स्पोर्ट पॅक आहे, ज्यामध्ये एम लाइटवेट बॅटरी, फोर्ज्ड व्हील्स आणि ॲडव्हान्स्ड परफॉर्मन्स फीचर्स आहेत.
या बाईकच्या कलर ऑप्शन्सबद्दल बोलायचे झाले तर, त्यात ब्लॅकस्टॉर्म मेटॅलिक, ब्लूफायर/Mugiallo येलो (स्टाईल स्पोर्ट), लाईटव्हाइट युनि/एम मोटोस्पोर्ट (एम पॅकेज) असे रंग आहेत.