फोटो सौजन्य: Pinterest
रॉयल एनफिल्ड मेटिओर 350 ही कंपनीची सर्वाधिक मायलेज देणारी बाईक आहे. काही वेबसाइटनुसार, ही बाईक 1 लिटर पेट्रोलवर 41 किमीचे अंतर कापू शकते. त्यामुळेच ही बाईक कंपनीची फ्युएल एफिशियंट बाईक म्हणून ओळखली जाते.
KTM 390 Adventure R लवकरच होणार लाँच! ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीसह मिळणार जबरदस्त फीचर्स
या बाईकच्या बेस मॉडेलची किंमत 1.96 लाख (एक्स शोरूम) रुपयांपासून सुरु होते. ही किंमत तुमच्याजवळील शोरूमनुसार बदलू देखील शकते.
नोव्हेंबरमध्ये रॉयल एनफील्डने त्यांच्या लोकप्रिय क्रूझर बाईक, मेटीओर 350 चे स्पेशल एडिशन सनडाउनर ऑरेंज व्हर्जन लाँच देखील लाँच केले होते. या स्पेशल एडिशनमध्ये चमकदार सनडाउनर ऑरेंज कलर स्कीम आहे. स्टँडर्ड मॉडेलच्या तुलनेत, या स्पेशल एडिशनमध्ये फॅक्टरी-फिटेड डिलक्स टूरिंग सीट, ट्रिपर नेव्हिगेशन पॉड, फ्लायस्क्रीन आणि पॅसेंजर बॅकरेस्ट आहे. यात एलईडी हेडलॅम्प, ॲल्युमिनियम ट्यूबलेस स्पोक व्हील्स, ॲडजस्टेबल लीव्हर्स, स्लिप-अँड-असिस्ट क्लच आणि यूएसबी टाइप-सी फास्ट चार्जिंग पोर्ट देखील आहे.
भारतात Toyota कधी आणणार Mini Fortuner? जाणून घ्या डिझाइनपासून फीचर्सपर्यंतची माहिती
रॉयल एनफील्डची मेटिओर 350 बाईक भारतीय बाजारात 350 सीसी क्षमतेच्या सेगमेंटमध्ये उपलब्ध आहे. ही बाईक थेट होंडा Honda CB 350, Yezdi Roadster 350 सारख्या बाईकसोबत स्पर्धा करते.






