फोटो सौजन्य: Gemini
जर तुम्ही डिसेंबरमध्ये नवीन बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हा काळ अनेक खरेदीदारांसाठी फायदेशीर ठरू शकतो. वर्षाच्या अखेरीस बहुतांश टू-व्हीलर कंपन्या आणि डीलरशिपकडून आकर्षक ऑफर्स दिल्या जातात. यामागचे कारण म्हणजे वर्ष संपण्यापूर्वी डीलर्सना जुना स्टॉक क्लिअर करायचा असतो. त्यामुळे ग्राहकांना चांगल्या डिल्स मिळण्याची संधी मिळते.
Maruti Grand Vitara चा टप्यात कार्यक्रम! 28.65 Kmpl मायलेज देणाऱ्या ‘या’ SUV ने मार्केट खाल्लं
डिसेंबरमध्ये बाईक खरेदी करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे भरघोस सवलत. या काळात कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस, कमी डाउन पेमेंट, स्वस्त किंवा मोफत इन्शुरन्स तसेच अॅक्सेसरी पॅकसारखे ऑफर्स मिळू शकतात. काही ठिकाणी झिरो-कॉस्ट फायनान्सची सुविधाही दिली जाते. याशिवाय, जानेवारीत होणारी किंमतवाढ लागू होण्यापूर्वी जुन्या दरात बाईक खरेदी करण्याची संधी मिळते, ज्यामुळे दीर्घकालीन बचत होते.
डिसेंबरमध्ये खरेदी केलेली बाईक पुढील महिन्यापासून मागील वर्षाची मानली जाते. या बाईक अगदी नवीन असल्या तरी पुन्हा विक्रीच्या वेळी ती एक वर्ष जुनी बाईक म्हणून समजली जाते, त्यामुळे रिसेल व्हॅल्यू थोडी कमी मिळू शकते. तसेच, काही कंपन्या नवीन वर्षात नवीन रंग किंवा काही फीचर अपडेट्स आणतात, जे डिसेंबरमध्ये खरेदी केलेल्या बाईकला मिळत नाहीत. कधी कधी पसंतीचा व्हेरिएंट किंवा रंग उपलब्ध नसण्याची शक्यताही असते.
3 लाखांचे डाउन पेमेंट आणि भारतातील सर्वाधिक लोकप्रिय EV तुमच्या दारात उभी, ‘असा’ असेल संपूर्ण हिशोब
डिसेंबरमध्ये बाईक खरेदी करताना फक्त सवलतीकडे पाहून निर्णय घेणे चुकीचे ठरेल. ऑन-रोड किंमत नेमकी किती आहे याची संपूर्ण माहिती घ्या आणि इन्शुरन्स कव्हर नीट समजून घ्या. एक्सचेंज ऑफरमध्ये जुन्या वाहनाला योग्य किंमत मिळतेय का, हेही तपासा. डिलिव्हरीपूर्वी बाईक नीट तपासणी करा, जेणेकरून कोणतेही नुकसान झालेली किंवा जुना स्टॉकची बाईक मिळणार नाही.
जर तुम्ही बाईक दीर्घकाळ वापरण्याचा विचार करत असाल तर डिसेंबर हा योग्य काळ आहे. या काळात तुम्हाला बाईक उत्तम किमतीत मिळेल. मात्र, नवीन मॉडेल ईयरची व्हॅल्यू आणि चांगली रिसेल किंमत महत्त्वाची असेल, तर जानेवारीपर्यंत वाट पाहणे अधिक फायदेशीर ठरू शकते.






