फोटो सौजन्य: Social Media
भारतीय मार्केटमध्ये दुचाकींच्या विक्रीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यामुळे रस्त्यांवरील वर्दळ देखील वाढताना दिसत आहे. काही प्रमाणात, अपघातांचे प्रमाण सुद्धा वाढताना दिसत आहे. यातील अनेक अपघात हेल्मेट न वापरल्यामुळे होत असतात.
मार्केटमध्ये अनेकदा आपल्याला स्वस्त किमतीत निकृष्ट दर्जाचे हेल्मेट पाहायला मिळतात. मात्र, असे हेल्मेट वापरणे आपल्या जीवावर बेतू शकते. परंतु, जर तुम्ही स्वस्त किमतीत ब्रँडेड हॅम्लेटच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
जर तुम्ही स्कूटर किंवा बाईकवरून प्रवास करत असाल तर सेफ्टीसाठी चांगले हेल्मेट वापरणे खूप महत्वाचे आहे. चांगल्या दर्जाचे हेल्मेट तुम्हाला सुरक्षा प्रदान करतातच, शिवाय वाहतूक पोलिसांकडून होणाऱ्या फाइनपासूनही तुमचे रक्षण करतात. नुकतेच हेल्मेट उत्पादक कंपनी स्टीलबर्डने दुचाकी चालकांसाठी एक नवीन हेल्मेट लाँच केले आहे, जे हाफ फेस हेल्मेट आहे. स्टीलबर्ड SBH-23 AVA हेल्मेट किती किमतीत लाँच केले गेले आहे? ते कोणत्या प्रकारच्या डिझाइन आणि फीचर्ससह लाँच केले गेले आहे? त्याबद्दल जाणून घेऊयात.
हेल्मेट उत्पादक कंपनी स्टीलबर्डने भारतीय बाजारात एक नवीन हेल्मेट (SBH-23 AVA) लाँच केले आहे. हे नवीन हेल्मेट हाफ फेस हेल्मेटच्या डिझाइनसह लाँच केले आहे.
स्टीलबर्ड हेल्मेट्सचे एमडी राजीव कपूर म्हणाले की, उन्हाळ्याच्या हंगामात बाईक चालवताना अनेक आव्हाने येतात – जसे की अति उष्णता, धूळ आणि लांब प्रवास. SBH-23 AVA सह, आम्ही एक हेल्मेट विकसित केले आहे, जे संरक्षण आणि व्हेंटिलेशन प्रदान करते.
हे हेल्मेट हाय इम्पॅक्ट ABS स्टाइल आणि मल्टी-लेयर हाय डेन्सिटी EPS सह येते, जे उत्कृष्ट प्रभाव शोषण प्रदान करते. यात पॉली कार्बोनेट अँटी-स्क्रॅच व्हिझर आणि आतील काळा सनशील्ड आहे, जो तेजस्वी सूर्यप्रकाशात देखील चांगली व्हीसीबिलिटी करतो. यामुळे डोळ्यांचा ताण कमी होतो आणि सुरक्षितता वाढवते.
SBH-23 AVA मध्ये युरोपियन स्टॅण्डर्ड मायक्रो-मेट्रिक बकल आहे, जे फास्ट आणि सुरक्षित लॉकिंग सुनिश्चित करते. त्यात लांब राईडसाठी नेक प्रोटेक्टर आणि लांब दृष्टी स्पष्टतेसाठी अँटी-स्क्रॅच कोटेड व्हिझर देखील समाविष्ट आहे.
रोड टॅक्सपासून नोंदणी शुल्क माफीपर्यंत, सरकारचा EV Policy 2.0 बाबत मोठा निर्णय
स्टीलबर्ड SBH-23 AVA भारतीय बाजारात 1299 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. हा हेल्मेट अनेक रंगांच्या ऑप्शन्ससह आणण्यात आला आहे. हे हेल्मेट M (580mm) L (600mm) आणि XL (620mm) साइझमध्ये खरेदी करता येईल.