• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • The Pune Metropolitan Region Development Authority Has Planned To Complete Several Projects

43 हजार कोटींचे ‘व्हिजन’; 204 प्रकल्पांतून बदलणार पुणे महानगर प्रदेशाचा चेहरामोहरा!

विस्कळीत नागरीकरण आणि वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकलेल्या पुणे महानगर प्रदेशाला भविष्यात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचे कोंदण लाभणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 07, 2026 | 03:10 PM
43 हजार कोटींचे 'व्हिजन'; 204 प्रकल्पांतून बदलणार पुणे महानगर प्रदेशाचा चेहरामोहरा!

सौजन्य - नवराष्ट्र टीम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पिंपरी/विजया गिरमे : विस्कळीत नागरीकरण आणि वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकलेल्या पुणे महानगर प्रदेशाला भविष्यात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचे कोंदण लाभणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) तब्बल ४३,७७४ कोटी रुपये खर्चाच्या २०४ प्रकल्पांचे जाळे विणले असून, यामुळे पुण्याच्या विकासाची दिशा आणि दशा दोन्ही बदलणार आहे. महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी ‘पीएमआरडीए’च्या या ५० वर्षांच्या नियोजित विकासकामांचा सविस्तर लेखाजोखा सादर केला.

महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांची नुकतीच अल्पसंख्याक विकास विभागाच्या सचिवपदी बदली झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना प्राधिकरणाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा घेतला. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांच्या सीमा ओलांडून विस्तारणाऱ्या या महानगराचा विचार केवळ आजचा नाही, तर पुढील ५० वर्षांच्या गरजा लक्षात घेऊन करण्यात आला असून, यात दळणवळण, सार्वजनिक वाहतूक, पर्यावरण रक्षण आणि शिस्तबद्ध गृहनिर्माण या चतु:सूत्रीवर भर देण्यात आला आहे.

वाहतूक कोंडी फोडण्यासाठी १८ हजार कोटींचे रस्ते प्रकल्प

पुणे महानगरातील वाहतूक कोंडीवर जालीम उपाय म्हणून ८३ किमीचा ‘इनर रिंग रोड’ हा प्रकल्प ‘गेमचेंजर’ ठरणार आहे. १४,२०० कोटी रुपये खर्चाचा हा मार्ग ५ टप्प्यांत नियोजित आहे. याशिवाय: पीएमआरडीए क्षेत्रात एकूण १८,६९७ कोटींच्या तरतुदीतून ५८९ किमी लांबीचे ९६ रस्ते प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. यात औद्योगिक कनेक्टिव्हिटी (६० किमी) आणि विमानतळ जोडणीसाठी (६१ किमी) विशेष रस्त्यांचा समावेश आहे.

चाकण व हिंजवडी भागातील कोंडी फोडण्यासाठी विशेष ‘डिक्लॉगिंग’ रस्ते तयार केले जाणार आहेत. येरवडा ते कात्रज दरम्यान ७,५०० कोटींचा २० किमीचा ‘ट्विन टनेल’ प्रस्तावित असून, त्याचा व्यवहार्यता अहवाल (Feasibility Report) तयार झाला आहे.

मेट्रो-३ आणि आधुनिक सार्वजनिक सुविधा

सार्वजनिक वाहतुकीला बळकटी देण्यासाठी हिंजवडी ते शिवाजीनगर या २३ किमीच्या ‘मेट्रो लाईन-३’ चे काम वेगाने सुरू आहे. ८,३१३ कोटींचा हा प्रकल्प एप्रिल २०२६ पर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचे उद्दिष्ट आहे. यासोबतच: लोणावळ्यातील टायगर व लायन्स पॉईंट येथे ८२२ कोटींचा स्कायवॉक प्रकल्प ‘पीपीपी’ तत्त्वावर साकारला जात आहे. पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्रासाठी (PIECC) ९८२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

शिस्तबद्ध शहरीकरण: १५ ‘टीपी स्कीम’वर भर

पुण्यातील विस्कळीत शहरीकरणाला शिस्त लावण्यासाठी प्राधिकरणाने १५ नगररचना योजना (TP Schemes) प्रस्तावित केल्या आहेत. सध्या १,८९२ कोटींच्या ५ योजना (माण-म्हाळुंगे, वडाचीवाडी, औताडे-हांडेवाडी, होळकरवाडी ४ व ५) मंजूर असून, त्या प्राथमिक टप्प्यात आहेत. तसेच, सेक्टर-१२ आणि औंध पोलीस गृहनिर्माण अशा प्रकल्पांतून १,२१८ कोटींची गुंतवणूक केली जात असून ही कामे अंतिम टप्प्यात आहेत.

पर्यावरण आणि पाणीप्रश्न

वाघोली परिसरातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी २३ कोटींची योजना पूर्णत्वाकडे असून, ती लवकरच हस्तांतरित केली जाणार आहे. नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी इंद्रायणी, पवना आणि मुळा-मुठा नद्यांमधील प्रदूषण रोखण्यासाठी १,९६७ कोटींचे ३ प्रकल्प निविदा स्तरावर आहेत. ३३५ किमीच्या सांडपाणी वाहिन्यांच्या जाळ्यासाठी १,२०९ कोटींचे नियोजन आहे.

पुणे महानगराचा विकास हा भविष्यातील ५० वर्षांचा विचार करून केला आहे. मेट्रो, रिंग रोड आणि टीपी स्कीम्समुळे पुण्याची अर्थव्यवस्था अधिक गतिमान होईल आणि हे शहर देशातील सर्वाधिक राहण्यायोग्य महानगर म्हणून नावारूपास येईल. — डॉ. योगेश म्हसे (IAS), महानगर आयुक्त, पीएमआरडीए.

Web Title: The pune metropolitan region development authority has planned to complete several projects

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 03:09 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

Chakan : स्थानिक बाजारपेठांना युद्धाच्या झळा; बाजारपेठेत मंदी, गॅस दरवाढ अन्…
1

Chakan : स्थानिक बाजारपेठांना युद्धाच्या झळा; बाजारपेठेत मंदी, गॅस दरवाढ अन्…

महावितरणच्या मनमानी कारभाराने ओतूरकर त्रस्त; हेमंत पाटील डुंबरे यांचा आंदोलनाचा इशारा
2

महावितरणच्या मनमानी कारभाराने ओतूरकर त्रस्त; हेमंत पाटील डुंबरे यांचा आंदोलनाचा इशारा

Railway News: पुणेकरांचा ‘हा’ प्रवास सुखकर होणार; ‘या’ रेल्वे मार्गाला गती मिळणार,
3

Railway News: पुणेकरांचा ‘हा’ प्रवास सुखकर होणार; ‘या’ रेल्वे मार्गाला गती मिळणार,

राज्याच्या अर्थसंकल्पात हेल्थ सेक्टरकडे दुर्लक्ष? आरोग्य सेवांवर परिणाम होण्याची शक्यता, तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त
4

राज्याच्या अर्थसंकल्पात हेल्थ सेक्टरकडे दुर्लक्ष? आरोग्य सेवांवर परिणाम होण्याची शक्यता, तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Kolhapur News : पंचगंगेचा वनवास संपणार कधी ? प्रदुषित पाण्यामुळे गावकऱ्यांच्या जीवाशी खेळ

Kolhapur News : पंचगंगेचा वनवास संपणार कधी ? प्रदुषित पाण्यामुळे गावकऱ्यांच्या जीवाशी खेळ

Mar 07, 2026 | 04:58 PM
बॉलीवूडपासून ग्लोबल रनवेपर्यंत: लंडन फॅशन वीकमध्ये रिक रॉयचा जलवा; भारतीय फॅशनचा गौरव जागतिक स्तरावर

बॉलीवूडपासून ग्लोबल रनवेपर्यंत: लंडन फॅशन वीकमध्ये रिक रॉयचा जलवा; भारतीय फॅशनचा गौरव जागतिक स्तरावर

Mar 07, 2026 | 04:53 PM
Iran Israel War : संकटाच्या काळात भारताला मदतीचा हात! ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाकडून अतिरिक्त गॅस पुरवठ्याचं आश्वासन

Iran Israel War : संकटाच्या काळात भारताला मदतीचा हात! ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाकडून अतिरिक्त गॅस पुरवठ्याचं आश्वासन

Mar 07, 2026 | 04:44 PM
घरी EV चार्ज करताना चुकूनही करू नका ‘या’ चुका! अन्यथा खिसा होईल चांगलाच रिकामा

घरी EV चार्ज करताना चुकूनही करू नका ‘या’ चुका! अन्यथा खिसा होईल चांगलाच रिकामा

Mar 07, 2026 | 04:44 PM
Bigg Boss Marathi 6 : अनपेक्षित वळण! सागरचा घरातील प्रवास संपला? रुचिताला आवरले नाही आंसू

Bigg Boss Marathi 6 : अनपेक्षित वळण! सागरचा घरातील प्रवास संपला? रुचिताला आवरले नाही आंसू

Mar 07, 2026 | 04:43 PM
स्टार प्लसवरच्या लोकप्रिय ‘अनुपमा’मालिकेत नवं वळण; सचिन त्यागीची धमाकेदार एन्ट्री

स्टार प्लसवरच्या लोकप्रिय ‘अनुपमा’मालिकेत नवं वळण; सचिन त्यागीची धमाकेदार एन्ट्री

Mar 07, 2026 | 04:30 PM
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन काँग्रेस आक्रमक; ‘या’ तारखेला कळमनुरी ते हिंगोली पदयात्रा

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन काँग्रेस आक्रमक; ‘या’ तारखेला कळमनुरी ते हिंगोली पदयात्रा

Mar 07, 2026 | 04:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
KALYAN : १६ मार्चला होणार KDMC ची महासभा, स्थायी समिती आणि सभागृह नेतेपदासाठी भाजप आग्रही

KALYAN : १६ मार्चला होणार KDMC ची महासभा, स्थायी समिती आणि सभागृह नेतेपदासाठी भाजप आग्रही

Mar 07, 2026 | 03:11 PM
THANE : घरगुती गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात ठाण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

THANE : घरगुती गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात ठाण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

Mar 07, 2026 | 03:09 PM
Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:49 PM
Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Mar 06, 2026 | 07:41 PM
Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:36 PM
Sindhudurg  : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Sindhudurg : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Mar 06, 2026 | 07:20 PM
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.