फोटो सौजन्य: @BunnyPunia/ X.com
भारतातील आघाडीच्या वाहन उत्पादकांपैकी एक असलेली टाटा मोटर्स अनेक सेगमेंटमध्ये कार ऑफर करते. कंपनी लवकरच कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये Tata Punch Facelift लाँच करण्याची तयारी करत आहे. या एसयूव्हीमध्ये देण्यात येणारी फीचर्स, याचे पॉवरफुल इंजिन आणि अपेक्षित किमतीबद्दल जाणून घेऊयात.
Tata Motors ची सर्वात किफायतशीर कार! फक्त 1 लाखाचे डाउन पेमेंट आणि EMI दहा हजारांपेक्षा कमी
एसयूव्हीच्या व्हेरिएंट्ससोबतच तिच्या काही प्रमुख फीचर्सची माहिती समोर आली आहे. अपडेटनंतर या एसयूव्हीमध्ये नवीन स्टिअरिंग व्हील, 360 डिग्री कॅमेरा, कनेक्टेड टेल लाइट, ऑटो-डिमिंग IRVM, कॉर्नरिंग फंक्शनसह ABS, LED फॉग लॅम्प, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तसेच ब्लाइंड स्पॉट मॉनिटर यासारखे आधुनिक फीचर्स देण्यात येणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या एसयूव्हीच्या पेट्रोल व्हेरिएंटमध्ये 1.2 लीटर क्षमतेचे टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात येऊ शकते. हेच इंजिन टाटा अल्ट्रोज ते पंच या मॉडेल्समध्ये ऑफर केले जाऊ शकते. या इंजिनमधून 118 BHP पॉवर आणि 170 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण होतो.
टाटा मोटर्सकडून पंच फेसलिफ्टच्या लाँचपूर्वीच त्याच्या व्हेरिएंट्स आणि फीचर्सची माहिती उघड झाली आहे. कंपनीकडून ही एसयूव्ही एकूण 6 व्हेरिएंट्समध्ये सादर केली जाणार आहे. यामध्ये Pure, Pure+, Adventure, Adventure+, Accomplished आणि Accomplished+ या व्हेरिएंट्सचा समावेश असेल.
निर्मात्याने आधीच स्पष्ट केले आहे की या एसयूव्हीचा फेसलिफ्ट भारतीय बाजारात अधिकृतपणे 13 जानेवारी 2026 रोजी लाँच केली जाणार आहे.
टाटा मोटर्स सध्या पंचला 5.50 लाखांच्या एक्स-शोरूम किमतीत ऑफर करते. त्याच्या टॉप-स्पेक व्हेरिएंटची किंमत 9.30 लाख (एक्स-शोरूम) आहे. फेसलिफ्टची किंमत 6 लाख ते 10 लाख (एक्स-शोरूम) च्या एक्स-शोरूम किंमतीत लाँच होण्याची अपेक्षा आहे.
टाटा कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये पंचची ऑफर देते. त्याचे फेसलिफ्ट Hyundai Exter,Renault Kiger, Nissan Magnite, आणि Maruti Suzuki Ignis सारख्या एसयूव्हीशी देखील स्पर्धा करते.






