कोणती मोटारसायक ठरली नंबर १?
Hero Splendor
Hero MotoCorp या वाहन निर्माण करणाऱ्या कंपनी कडून Splendor ही मोटरसायकल विकली जाते. विक्री अहवालानुसार ही मोटरसायकल पहिल्या क्रमांकावर राहिली. गेल्या आर्थिक वर्षात या मोटरसायकलीला सर्वाधिक मागणी नोंदवली गेली. या कालावधीत तिच्या 37.27 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री झाली.
Honda Shine
Honda कडून Shine ही मोटरसायकल 100 आणि 125 सीसी सेगमेंटमध्ये उपलब्ध आहे. अहवालांनुसार, गेल्या आर्थिक वर्षात तिची 19.87 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री झाली. विक्री अहवालानुसार या मोटारसायकलने दुसरा क्रमांक नोंदवला आहे.
सिंगल चार्जवर 630 किमी रेंज अन् 9 मिनिटात फुल चार्ज! BYD ने सादर केली नवीन Electric Car
Bajaj Pulsar
Bajaj कडून Pulsar ही मोटरसायकल भारतीय बाजारात विकली जाते. ही विविध सेगमेंटमध्ये उपलब्ध आहे. माहितीनुसार, गेल्या आर्थिक वर्षात तिची 13.99 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री झाली. विक्री अहवालानुसार Bajaj Pulsar मोटारसायकलने तिसरा क्रमांक नोंदवला आहे.
Hero HF Deluxe
Hero MotoCorp कडून बजेट सेगमेंटमध्ये HF Deluxe ही मोटरसायकल देखील उपलब्ध आहे. गेल्या आर्थिक वर्षात तिची 10.12 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री झाली. विक्री अहवालानुसार Hero HF Deluxe मोटारसायकलने चौथा क्रमांक नोंदवला आहे.
TVS Apache
TVS कडूनही भारतात विविध सेगमेंटमध्ये मोटरसायकली विकल्या जातात. Apache सिरीजही अनेक प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. माहितीनुसार, गेल्या आर्थिक वर्षात तिची 5.71 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री झाली. विक्री अहवालानुसार TVS Apache मोटारसायकलने पाचवा क्रमांक नोंदवला आहे.
E-Scooter अचानक कमी रेंज देतेय? ‘हे’ गोल्डन रुल्स आणि बॅटरी लाईफ वाढलीच म्हणून समजा
Ans: Hero Splendor ही नंबर 1 ठरली.
Ans: Honda Shine दुसऱ्या क्रमांकावर आहे.
Ans: Splendor, Shine, Pulsar, HF Deluxe आणि Apache.






