जगातील सर्वात बारीक आणि पातळ कार (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
जगभरात अशा अनेक कार आहेत ज्या पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्यचकित करतात, कारण त्यांची रचना आणि त्यांचे वैशिष्ट्य हे अगदीच वेगळे असते. पण, आज आम्ही तुम्हाला अशी कार दाखवणार आहोत जी पाहून तुम्हाला अक्षरशः कळणारच नाही की कार आहे. खरं तर, या कारची रचना अशी आहे की आतापर्यंत ज्यांनी ही कार पाहिली आहे त्यांना हे नक्की काय आहे हे समजण्यासाठी काही मिनिटे लागली आहेत. तर आता जास्त सस्पेन्स निर्माण करत नाही आपण जाणून घेऊया अनोख्या कारबद्दल
जगातील ही सर्वात बारीक कार नक्की कुठे आहे आणि ही कोणी निर्माण केली आहे याची आता तुम्हालाही आमच्याप्रमाणे नक्कीच उत्सुकता लागून राहिली असणार ना? तर तुमची ही उत्सुकता आता जास्त काळ टिकवून ठेवत नाही, नक्की वाचा (फोटो सौजन्य – Instagram)
कारचे वैशिष्ट्य
मोटारसायकलपेक्षा बारीक आणि उशापेक्षा थोडीशी रुंदी असलेली कार? इटलीतील पांडा ई पांडिनो २०२५ कार्यक्रमात मेकॅनिक अँड्रिया मराझीने नेमके हेच करून दाखवले आहे. “पांडा फॉर वन” असे नाव देण्यात आलेले हे वाहन फक्त १९ इंच रुंद आहे, ज्यामुळे ही अधिकृतपणे जगातील सर्वात बारीक अशी कार म्हणून प्रसिद्ध होतेय.
कशी आहे कार
फियाट पांडाच्या ४५ व्या वर्धापन दिनानिमित्त (१९-२२ जून २०२५) अनावरण करण्यात आलेल्या या सिंगल-सीटर इलेक्ट्रिक कारने त्याच्या अत्यंत पातळ, कार्टूनिश लुकने लोकांना चकीत केले. पेस्टल निळ्या रंगात रंगवलेल्या या कारमध्ये एकच फ्रंट हेडलाइट, पातळ आणि बारीकशी चार चाके आणि दोन विंग मिरर आहेत जे कारच्या रुंदीचा मोठा भाग ठरत आहेत
जरी ते २D स्केचसारखे दिसत असले तरी, पांडा फॉर वन पूर्णपणे कार्यरत आहे. कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक मोटरमुळे पुढे आणि मागे जाण्यास, स्टीअरिंग आणि ब्रेकिंग करण्यास सक्षम आहे. आत, त्यात एकच फ्रंट सीट, मुलांसाठी एक छोटी पर्यायी बॅक सीट, मॅन्युअल खिडक्या आणि लहान मायक्रोवेव्हसाठी पुरेशी मोठी ट्रंक आहे.
ड्रायव्हर गाडीत कसा प्रवेश करतो
ड्रायव्हर एकाच दरवाजातून गाडीत प्रवेश करतो आणि मागच्या प्रवाशांना (जर असेल तर) समोरून आत जावे लागते. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कार डिझाईन कऱणाऱ्या व्यक्तीने म्हटले की, जेव्हा आई कार धुत होती तेव्हा ती आकुंचन पावली आणि इतकी बारीक झाली. त्याने तिचे कॉम्पॅक्ट इंटीरियर, लहान व्हेंट्स आणि सिग्नेचर फियाट स्टीअरिंग व्हील दाखवले आहे.
Toyota Innova Hycross ची झाली Crash Test, B NCAP कडून मिळाली ‘एवढी’ रेटिंग
कार सोशल मीडियावर व्हायरल
या कारची ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे, ज्यावर लोकांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण या अनोख्या शोधाने प्रभावित झाले आहेत, तर काहींनी त्याची खिल्लीही उडवली आहे. एका वापरकर्त्याने विनोदाने लिहिले की, “माझे सध्याचे बजेट.” दुसऱ्याने म्हटले, “मला या कारला मोटारसायकल शर्यतीसारख्या वेगाने वळण घेताना पहायचे आहे.” तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “गणिताचा प्रश्न: जॉनच्या कारचा परीघ किती आहे? उत्तर: २० सेमी लांबी, ४ सेमी रुंदी.”
दरम्यान काही जणांना ही कार भलतीच आवडली आहे. पण आता ही कार जगभरात कुठे आणि कशी दिसू शकते असाही प्रश्न कार लव्हर्सना पडला नसेल तर आश्चर्य?
जगातील सर्वात बारीक कार