फोटो सौजन्य: @turbochargedmag (X.com)
भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना चांगली मागणी मिळत आहे. हीच मागणी लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्या त्यांची वाहनं इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये ऑफर करत आहे. बाजारात इलेक्ट्रिक स्कूटरला सुद्धा चांगली मागणी मिळतेय. म्हणूनच तर दरमहा Ola Electric आणि Ather सारख्या इलेक्ट्रिक दुचाकी उत्पदक कंपन्यांच्या विक्रीत वाढ होत आहे. अशातच आता मार्केटमध्ये TVS ने एका नवा इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केला आहे.
टीव्हीएस मोटर कंपनीने अखेर त्यांची इलेक्ट्रिक स्कूटर Orbiter लाँच केली आहे. बंगळुरूमध्ये त्याची एक्स-शोरूम किंमत 99,900 रुपये ठेवण्यात आली आहे. टीव्हीएस ऑर्बिटरमध्ये iQube च्या डिझाइन एलिमेंटसह काही नवीन डिझाइन्स आहेत. ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर अनेक फीचर्सनी सुसज्ज आहे. चला या नवीन स्कूटरबद्दल जाणून घेऊयात.
35 KM चा मायलेज आणि किंमतही खिशाला परवडणारी! रोजच्या वापरासाठी बेस्ट आहेत ‘या’ कार
डिझाइनच्या बाबतीत, Orbiter चा लूक थोडासा फंकी दिसतो. त्यात अनेक रंग पर्याय आहेत जे या स्कूटरला वेगळे बनवतात. त्याची सीट 845 मिमी लांब आहे आणि त्याचा फ्लोअरबोर्ड देखील 290 मिमी रुंद आहे. हँडलबार रायडरला सरळ राइडिंग ट्रायअँगल देतो ज्यामुळे स्कूटर चालवण्यास अजून आरामदायी बनते.
या स्कूटरमध्ये सीटखाली तब्बल 34 लिटर स्टोरेज स्पेस दिलं आहे आणि त्याला 169 मिमी ग्राउंड क्लीअरन्स मिळतो. पुढच्या बाजूला 14 इंचाचे अलॉय व्हील वापरण्यात आले आहे, तर मागे 12 इंचाच्या व्हीलमध्ये इलेक्ट्रिक मोटर बसवण्यात आली आहे.
संजय दत्तने खरेदी केली 4 कोटीची Mercedes Maybach GLS600, काय आहेत खास फिचर्स
टीव्हीएस ऑर्बिटरमध्ये 3.1 kWh बॅटरी पॅक देण्यात आला असून, IDC च्या मानकानुसार एकदा पूर्ण चार्ज केल्यावर हा स्कूटर158 किमीपर्यंतची रेंज देतो. यात इको आणि पॉवर असे दोन रायडिंग मोड्स मिळतात. यासोबतच हा स्कूटर रीजेनेरेटिव्ह ब्रेकिंगसह येतो. मात्र, सध्या या स्कूटरच्या इलेक्ट्रिक मोटरचे स्पेसिफिकेशन्स आणि चार्जिंग वेळेबाबतची माहिती कंपनीने जाहीर केलेली नाही.
टीव्हीएस ऑर्बिटरची फीचर्स आणि कलर ऑप्शन्स
टीव्हीएस असल्याने ऑर्बिटरमध्ये अनेक फीचर्स आहेत. सर्वत्र एलईडी लाईटिंग आहे, मोबाईल डिव्हाइस चार्ज करण्यासाठी यूएसबी चार्जिंग पोर्ट आहे, कॉम्पॅक्ट स्पेस आणि ओटीए अपडेट्स आहेत. तुम्हाला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनसह डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळेल.