फोटो सौजन्य: Social Media
भारतीय ऑटो बाजारात अनेक बेस्ट कंपन्या आहेत, ज्या ग्राहकांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार चांगल्या कार ऑफर करत असतात. यातीलच एक अग्रगण्य नाव म्हणजे टाटा मोटर्स. टाटाने देशात विविध सेगमेंटमध्ये उत्तम कार उपलब्ध करून दिल्या आहेत.
ग्राहकांचा देखील टाटा मोटर्सवर एवढा विश्वास आहे की जेव्हा कधी ते कार खरेदी करतात, तेव्हा सर्वप्रथम टाटाच्याच कारचा विचार करत असतात. म्हणूनच तर कंपनीच्या विक्रीत झपाट्याने वाढ होत आहे. काही महिन्यांपासून Tata Punch ही कंपनीची नंबर 1 कार होती. पण आता या कारला कंपनीच्याच कारने विक्रीच्या बाबतीत मागे सोडले आहे.
कार खरेदीदारानो लक्ष द्या ! महाराष्ट्रात April 2025 पासून ‘या’ 5 कारची किंमत वाढण्याची शक्यता
टाटाच्या कार भारतीय बाजारपेठेत खूप लोकप्रिय आहेत. जर आपण गेल्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी 2025 मध्ये झालेल्या विक्रीबद्दल बोललो तर कंपनीच्या एकूण कार विक्रीत टाटा नेक्सॉनचा वाटा सर्वाधिक होता. या कालावधीत टाटा नेक्सॉनने 6.63 टक्के वार्षिक वाढीसह SUV च्या 15,349 युनिट्स विकून अव्वल स्थान मिळवले आहे. तर फेब्रुवारी 2024 मध्ये हा आकडा 14,395 युनिट्स होता. तर जानेवारी 2025 मध्ये, टाटा पंचने अव्वल स्थान मिळवले. या कारचे इलेक्ट्रिक व्हेरियंट देखील मॉडेलनुसार विक्रीमध्ये समाविष्ट केले गेले आहे. चला, कंपनीच्या इतर मॉडेल्सच्या विक्रीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
या विक्री यादीत टाटा पंच दुसऱ्या स्थानावर आहेत. फेब्रुवारी 2025 मध्ये टाटा पंचने एकूण 14,569 एसयूव्ही विकल्या. तर टाटा टियागो या विक्री यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. या कालावधीत टाटा टियागोला एकूण 6,954 नवीन ग्राहक मिळाले. याशिवाय, या विक्री यादीत टाटा कर्व्ह चौथ्या स्थानावर आहे. या कालावधीत टाटा कर्व्हने एकूण 3,483 कार विकल्या. तर टाटा अल्ट्रोज या विक्री यादीत पाचव्या क्रमांकावर होती. या कालावधीत टाटा अल्ट्रोझला एकूण 1,604 नवीन ग्राहक मिळाले आहे.
टोयोटा किर्लोस्कर मोटरने सादर केला हाईलक्स ब्लॅक एडिशन; सामर्थ्य, परिष्कृतता आणि साहसाचा अनोखा मिलाफ
दुसरीकडे, या विक्री यादीत टाटा सफारी सहाव्या स्थानावर होती. या कालावधीत टाटा सफारीने एकूण 1,562 एसयूव्ही विकल्या, ज्यामध्ये वर्षानुवर्षे 41 टक्क्यांची घट झाली. तर टाटा टिगोर या विक्री यादीत सातव्या स्थानावर होती. या कालावधीत टाटा टिगोरने एकूण 1,550 युनिट्सची विक्री केली, ज्यामध्ये वर्षानुवर्षे 9.46 टक्क्यांची घट झाली. तर टाटा हॅरियर या विक्री यादीत आठव्या क्रमांकावर होती. या कालावधीत टाटा हॅरियरने एकूण 1,376 एसयूव्ही विकल्या, ज्यामध्ये वर्षानुवर्षे 46.29 टक्क्यांची घट झाली.
भारतीय बाजारपेठेत, टाटा नेक्सॉनची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत टॉप मॉडेलसाठी 8 लाख रुपयांपासून ते 14.70 लाख रुपयांपर्यंत आहे. टाटा नेक्सॉनची सर्वात खास गोष्ट म्हणजे ही एसयूव्ही ग्राहकांना पेट्रोल, डिझेल तसेच सीएनजी आणि इलेक्ट्रिक पॉवरट्रेनसह उपलब्ध आहे.