फोटो सौजन्य: iStock
भारतात अनेक ऑटो कंपनीज नवनवीन कार्स लाँच करत असतात. बदलत्या काळानुसार ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षेनुसार अनेक कंपनीज विविध कार्स नवीन व्हर्जनसह बाजारात आणतात. जर्मन ऑटोमोबाईल उत्पादक भारतीय मार्केटमध्ये कार आणि एसयूव्ही सेगमेंटमध्ये विविध कार्स विकत आहे. लवकरच कंपनी आपल्या दोन कार्सचे फेसलिफ्ट व्हर्जन मार्केटमध्ये आणणार आहे. तसेच या कारमध्ये अनेक बदल केले जाणार आहे. चला जाणून घेऊया, या कार्स कधीपर्यंत मार्केटमध्ये दाखल होऊ शकतात.
फोक्सवॅगन भारतीय बाजारपेठेत तीन कार्स विकते. ज्यामध्ये Volkswagen Virtus, Volkswagen Taigun आणि Volkswagen Tiguan यांचा समावेश आहे. यापैकी, Virtus मध्यम आकाराच्या सेडान कार सेगमेंटमध्ये आणि Taigun मध्यम आकाराच्या SUV सेगमेंटमध्ये ऑफर केली जाते. रिपोर्ट्सनुसार, कंपनीने यापैकी दोन कारचे फेसलिफ्ट व्हर्जन भारतीय बाजारात आणण्याची योजना आखली आहे.
हे देखील वाचा: जुनी कार विकायची आहे का? अशाप्रकारे ठरवा तिची योग्य किंमत
या संदर्भात कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी आपल्या Virtus आणि Taigun चे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच करण्याच्या तयारीत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी 2026 पर्यंत या दोन कारचे फेसलिफ्ट व्हर्जन मार्केटमध्ये आणू शकते. ज्यामध्ये अनेक बदल केले जाऊ शकतात. पण त्यांच्या इंजिनमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होण्याची शक्यता कमी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी आपल्या दोन्ही कारमध्ये मुख्यतः थोडेफार बदल करणार आहे. या बदलांमध्ये फ्रंट ग्रिल, लाइट्स, रिअर प्रोफाइल तसेच इंटिरिअरमधील बदलांचा समावेश असू शकतो. या व्यतिरिक्त, कंपनी या दोन कारच्या सध्याच्या व्हर्जन्समध्ये उपलब्ध फीचर्सपेक्षा थोडे अधिक फीचर्स देखील देऊ शकते, ज्यामध्ये ADAS सारखी फीचर्स समाविष्ट केले जाऊ शकतात.
काही काळापूर्वी, हे उघड झाले होते की फोक्सवॅगन 2028 पर्यंत केवळ इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये कार्स विक्रीसाठी उपलब्ध करेल. पण अलीकडच्या काळात ईव्ही सेगमेंटमधील कार्सच्या विक्रीत घट झाल्यामुळे कंपनीने आता आपली स्ट्रॅटर्जीत बदल केला आहे. त्यानंतरच आता दोन कारच्या फेसलिफ्ट व्हर्जन लाँच होणार असल्याची बातमी समोर येत आहे.