फोटो सौजन्य: @virgaynity (X.com)
आपली स्वतःची कार असावी हे प्रत्येक मध्यमवर्गीय व्यक्तीचे स्वप्न असते. हेच स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी अनेक जण दिवसरात्र कष्ट करत असतात. यातही अनेक जणांना कार खरेदी करताना संपूर्ण रक्कम भरता येत नाही. अशावेळी मग कार लोनच्या साहाय्याने ते काही रक्कम डाउन पेमेंटच्या स्वरूपात भरत असतात.
भारतीय मार्केटमध्ये विविध सेगमेंटमध्ये कार ऑफर केल्या जातात. यातही अनेक जणांची पहिली पसंत ही एसयूव्ही कारलाच असते. देशात अनेक दमदार एसयूव्ही आहेत. Hyundai Creta ही त्यातीलच एक. भारतीय बाजारपेठेत ह्युंदाई क्रेटाची मोठी मागणी आहे. त्यामुळेच क्रेटा दरमहा सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयूव्हींपैकी एक आहे.
क्रेटा ही एक बजेट-फ्रेंडली कार आहे. तिची एक्स-शोरूम किंमत 11.11 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 20.42 लाख रुपयांपर्यंत जाते. ह्युंदाईची ही कार पेट्रोल आणि डिझेल दोन्ही व्हेरिएंटमध्ये बाजारात उपलब्ध आहे.
नादच खुळा ! Anant Ambani च्या प्रत्येक कारची किंमत 1 कोटींपासून सुरु, जाणून घ्या कार कलेक्शन
दिल्लीमध्ये ह्युंदाई क्रेटाच्या बेस मॉडेलची ऑन-रोड किंमत सुमारे 12.93 लाख रुपये आहे. ही कार कार लोनवर देखील खरेदी करता येते. ह्युंदाई क्रेटा खरेदी करण्यासाठी तुम्हाला बँकेकडून 12.49 लाख रुपयांचे लोन मिळेल. कर्जाची रक्कम क्रेडिट स्कोअरवर देखील अवलंबून असते.
जर तुम्ही ह्युंदाई क्रेटा खरेदी करण्यासाठी 50000 रुपयांचे डाउन पेमेंट केले तर 9.8 टक्के दराने तुम्हाला 4 वर्षांसाठी दरमहा 31,569 रुपये EMI भरावा लागेल. जर तुम्ही 5 वर्षांसाठी लोन घेतले तर तुम्हाला 9.8 टक्के व्याजदराने दरमहा 26,424 रुपये EMI जमा करावा लागेल.
याशिवाय, जर तुम्ही ह्युंदाई क्रेटा खरेदी करण्यासाठी 6 वर्षांचे लोन घेतले तर तुम्हाला 9.8 टक्के व्याजदराने 23,021 रुपयांचा ईएमआय जमा करावा लागेल. ह्युंदाई कार खरेदी करण्यासाठी, 7 वर्षांसाठी कर्ज घेतल्यावर तुम्हाला 9.8 टक्के दराने दरमहा 20,613 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.
आता Hyundai AURA अजूनच झाली किफायतशीर, ‘या’ स्वस्त किमतीत लाँच झाला नवीन व्हेरिएंट
Hyundai Creta 2025 मध्ये तीन इंजिन पर्याय आहेत: 17.4 से 18.2 किमी प्रति लिटर मायलेज देणारे 1.5L लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन, अधिक पॉवर आणि रिफाइनमेंटसाठी ओळखले जाणारे 1.5L टर्बो पेट्रोल इंजिन आणि 21.8 किमी प्रति लिटर पर्यंत उत्तम इंधन कार्यक्षमता देणारे 1.5L डिझेल इंजिन. हे सर्व इंजिन मॅन्युअल, सीव्हीटी आणि 7-स्पीड डीसीटी ट्रान्समिशन पर्यायांसह उपलब्ध आहेत, जे वेगवेगळ्या ड्रायव्हिंग स्टाईलसाठी बनवले आहेत.