फोटो सौजन्य; X.com
भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना चांगली मागणी मिळत आहे. ग्राहकांची हीच मागणी ध्यानात ठेवत अनेक ऑटो कंपन्या देशात दमदार रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक कार ऑफर करत आहे. मात्र, बहुतांश इलेक्ट्रिक कार या थोड्या महाग असल्याने ग्राहक वाहन खरेदी करताना विचार करत असतात. हीच बाब लक्षात घेत, MG मोटर्सने देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आणली. ही कार म्हणजे MG Comet EV.
भारतीय मार्केटमध्ये, एमजी मोटर्सने अनेक सेगमेंटमध्ये कार ऑफर केल्या आहेत. जर तुम्ही कंपनीने ऑफर केलेल्या सर्वात स्वस्त ईव्ही, MG Comet EV चा बेस व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि 1 लाख रुपयांचे डाउनपेमेंट केल्यानंतर कार घरी आणू इच्छित असाल, तर तुम्हाला दरमहा किती EMI भरावा लागेल त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
एमजीच्या (MG) कॉमेट ईव्ही (Comet EV) चा बेस व्हेरिएंट म्हणून Executive ऑफर केला जातो. या कारच्या बेस व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 7.49 लाख रुपये आहे. जर ही कार दिल्लीत खरेदी केली, तर आरटीओसाठी कुठलाही चार्ज द्यावा लागणार नाही. मात्र, सुमारे 32 हजार रुपये इन्शुरन्स द्यावे लागतील. त्यामुळे MG Comet EV Executive ची ऑन-रोड किंमत अंदाजे 7.82 लाख रुपये इतकी पडते.
जर आपण या कारचा बेस व्हेरिएंट Executive खरेदी करत असाल, तर बँकेकडून एक्स-शोरूम किंमतीवरच फायनान्स मिळेल. अशा वेळी 1 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला जवळपास 6.82 लाख रुपयांचे बँकेकडून कर्ज घ्यावे लागतील. बँक जर तुम्हाला 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी 6.82 लाख रुपये देते, तर तुम्हाला दर महिन्याला 10,974 रुपये EMI पुढील सात वर्षे भरावे लागेल.
जर तुम्ही 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी 6.82 लाख रुपयांचे कार लोन घेतले, तर तुम्हाला दर महिन्याला 10,974 रुपयांचा EMI द्यावा लागेल. अशा पद्धतीने 7 वर्षांत तुम्ही MG Comet EV साठी जवळपास 2.39 लाख रुपये व्याज म्हणून भराल. त्यामुळे कारची एकूण किंमत अंदाजे 10.21 लाख रुपये इतकी होईल.