फोटो सौजन्य: @hondaitaliamoto (X.com)
भारतात आजही बाईक खरेदी करताना ग्राहक त्याच्या मायलेज आणि किमतीवर विशेष लक्षकेंद्रित करत असतो. म्हणूनच तर सर्वच दुचाकी उत्पादक कंपन्या भारतात बेस्ट मायलेज देणाऱ्या बाईक ऑफर करत असतात. यात होंडाने देशात अनेक उत्तम बाईक ऑफर केल्या आहेत, ज्या स्वस्त किमतीत मस्त परफॉर्मन्स देत आहे.
नुकतेच होंडाने टू व्हीलरने भारतात Honda SP 125 म्हणून ओळखली जाणाऱ्या बाईकचे अपडेटेड व्हर्जन 2025 Honda CB125F लाँच केली आहे. नवीन होंडा CB125F मध्ये मागील जनरेशनच्या तुलनेत अनेक बदल करण्यात आले आहेत, ज्यामध्ये फीचर्सपासून ते इंजिनपर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत. तांत्रिकदृष्ट्या ही बाईक 2025 ची होंडा CB125F असली तरी, ब्रँड त्याला 2026 चे मॉडेल म्हणत आहे. 2025 Honda CB125F मध्ये कोणते मोठे अपडेट्स मिळाले आहेत, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
प्रीमियम आणि अॅडव्हान्स फीचर्सने सुसज्ज असणाऱ्या ‘या’ कारवर मिळतंय 2.70 लाखांचे डिस्काउंट
होंडा CB125F मधील पहिले अपडेट म्हणजे नवीन TFT कन्सोल, जे कंपनीच्या मोठ्या बाईक्समध्ये वापरले जाते. हे स्पीड, वेळ, टॅकोमीटर रीडिंग, गिअर पोझिशन आणि ओडोमीटर आणि ट्रिप मीटर रीडआउट्स सारखे महत्त्वाचे रीडआउट्स दाखवते. या कन्सोलमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि होंडा रोडसिंक मोबाइल अॅपद्वारे कॉल/एसएमएस अलर्ट, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि म्युझिक कंट्रोल यासारख्या संबंधित फीचर्ससह येते. या फीचर्सच्या समावेशानंतर, ती पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम बाईक बनली आहे.
होंडा CB125F मध्ये आयडलिंग स्टॉप सिस्टम समाविष्ट करण्यात आले आहे, ज्यामुळे बाईकचा मायलेज वाढण्यास मदत होईल. ही सिस्टम रहदारीत निष्क्रिय असताना काही काळ इंजिनचे पॉवर खंडित करते. त्याच्या मदतीने, रायडर क्लच दाबून आणि सोडून बाईक पुन्हा सुरू करू शकेल. यासोबतच, बाईकमधून चांगले मायलेज मिळावे यासाठी ECU देखील अपडेट करण्यात आले आहे. या बाईकबद्दल कंपनीचा दावा आहे की CB125F प्रति लिटर 66.7 किमी मायलेज देते.
Tata ची सर्वात स्वस्त कार झाली महाग, जाणून घ्या कोणत्या व्हेरियंटची किती वाढली किंमत
होंडा CB125F मध्ये SP 125 प्रमाणेच 124cc, एअर-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन वापरले आहे, जे 10.8PS पॉवर आणि 10.9Nm टॉर्क निर्माण करते. या बाईकमध्ये पूर्वीसारखेच टेलिस्कोपिक फोर्क्स आणि ट्विन-शॉक आहेत. बाईकमध्ये दिलेली दोन्ही व्हील्स 18-इंच आहेत. ब्रेकिंग सेटअप पूर्वीसारखाच आहे, समोर 240 मिमी डिस्क आणि मागील बाजूस 130 मिमी ड्रम ब्रेक आहे.
पूर्वीप्रमाणेच, ही बाईक इम्पीरियल रेड मेटॅलिक, मॅट मार्वल ब्लू मेटॅलिक आणि नवीन मॅट अॅक्सिस ग्रे मेटॅलिक रंग पर्यायांमध्ये आणण्यात आली आहे. या बाईकच्या हँडलबारजवळ एक USB C-प्रकारचा चार्जिंग पोर्ट देखील मिळतो, ज्यामुळे तुम्ही प्रवासात तुमचा स्मार्टफोन चार्ज करू शकता.
होंडा एसपी 125 भारतीय बाजारात 2 व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. त्याच्या ड्रम ब्रेक व्हेरियंटची किंमत 92,678 रुपये आणि डिस्क व्हेरियंटची किंमत 1,00,948 रुपये आहे. या अपडेट्ससह, 2025 Honda CB125F देखील लवकरच भारतात लाँच केली जाऊ शकते. अनेक अपडेट्सनंतरही, या बाईकच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही, ती €३,१९९ (भारतीय चलनात 3.05 लाख रुपये) च्या सुरुवातीच्या किमतीत आणण्यात आली आहे.