फोटो सौजन्य- iStock
लग्न तोडण्याचा व्यवसाय कधी ऐकलाय का? हो आज हा व्यवसाय बनला आहे त्यातून वारेमाप पैसा कमावणार व्यावसायिकही आहे. सध्या जगात मॅरेज ब्रेकरचा अजब व्यवसाय करणाऱ्या स्पेनमधील व्यक्तीची चर्चा आहे. मॅरेज ब्रेकरचा व्यवसाय या व्यक्तीने नियोजनपूर्व सुरु केला नव्हता. तर एकेकाळी हे काम गंमत म्हणून सुरु केले होते आता या कामाचे व्यवसायामध्ये रुपांतरण झाले आहे. हा व्यक्ती हे काम लोकांच्या मागणीमुळे करत आहे. लग्नाआधी अनेक जण या व्यक्तीशी संपर्क साधतात आणि त्याला चांगले पैसे देतात मग हा व्यकती लग्न सोहळा विस्कळीत करतो त्यामुळे लग्न पुढे ढकलण्यात येते. एक लग्न थांबविण्यासाठी हा व्यावसायिक 500 युरो फी घेतो म्हणजेच रुपयांप्रमाणे जवळजवळ 47 हजार रुपये. लोकांची इतकी प्रचंड मागणी आहे की, डिसेंबरपर्यंत सर्व बुकिंग फुल्ल झाले आहेत.
फोटो सौजन्य- सोशल मीडिया
स्पेनमधील मॅरेज ब्रेकर व्यावसायिकाचे नाव आहे अर्नेस्टो रेनारेस वारेआ . वारेआ याने एक ऑनलाईन जाहिरात गंमत म्हणून पोस्ट केली होते ज्यामध्ये त्याने लिहिले होते की, तुम्ही लग्नाच्याबाबतीत साशंक आहात, नाही म्हणू शकत नसाल तर चिंता करु नका मी तुमच्या लग्नावर आक्षेप घेईन. हा एक प्रॅंक होता ज्याचे मुख्य आकर्षण हे होते की तो हे करण्यासाठी 500 युरो फी आकारणार आणि ते लग्न नाट्यमयरित्या मोडणार. सुरुवातीला गंमतीने सुरु झालेले हे प्रकरण नंतर व्यवसायामध्ये बदलले. लोक स्वत:हून त्याला संपर्क करु लागले. वारेया ने न्युजफ्लॅशला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले, माझ्याकडे डिसेंबरपर्यंत लग्नसोहळ बुक आहेत. या वाढत्या मागणीमुळे तो स्वत:ही आश्चर्यचकित आहे.
वारेआ हा आपले काम अतिशय नाट्यमय पद्धतीने करतो. तो एक सीक्रेट लव्हरच्या रुपात लग्नसोहळ्यात येतो आणि सोहळ्याला मध्येच थांबवतो. ज्यांना अजून ड्रामेबाजी हवी असते त्यांच्याकडून तो अधिक फी घेतो. या ड्रामेबाजीमध्ये तो पाहुण्यांकडून थप्पड खातो. त्याचे तो 50 युरो म्हणजे 4700 रुपये अतिरिक्त चार्ज करतो.
वारेया याचे हे काम एक नवीन ट्रेंड बनले आहे. ज्या ग्राहकांना लग्नाच्याबाबतीमध्ये अंतिम क्षणी मागे यायचे असते ते वारेयाशी संपर्क करतात. आणि दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत आहे.