नवी मुंबईत Indriya या आदित्य बिरला ज्वेलरी ब्रँडच्या भव्य दालनाची सुरुवात
आदित्य बिरला ज्वेलरी ब्रँड, इंद्रिया, आपल्या तिसऱ्या दालनाचा शुभारंभ नवी मुंबईतील सीवुड्स येथे करत आहे, ज्यामुळे नवी मुंबईत या ब्रँडचा विस्तार अधिक चांगला झाला आहे. नेक्सस सीवुड्स मॉलमधील हे नवीन दालन ग्राहकांना एक अद्वितीय आणि Personalized दागिने खरेदी करण्याचा अनुभव देईल, ज्यात पारंपरिक हस्तकला आणि आधुनिक डिझाईन यांचा समृद्ध संगम असेल. काही दिवसांपूर्वीच, या ब्रँडने हैदराबादमध्ये दोन नवीन दालनांचा शुभारंभ केला गेला, ज्यामुळे दक्षिण भारतातील बाजारात इंद्रियाची उपस्थिती आणखी बळकट झाली आहे.
नवी मुंबईतील हे दालन भव्यतेने डिझाइन केलेले असून, त्यात एक विशेष कारीगरी रूम आहे, जिथे इंद्रिया ब्रँडच्या दागिन्यांमध्ये वापरलेली आकर्षक कलात्मकता प्रदर्शित केली गेली आहे. हे दालन ग्राहकांना एक अत्यंत उत्तम अनुभव प्रदान करते. या परिसरात असलेल्या लक्षणीय विकासामुळे, सीवुड्स आता एक चैतन्यशील आणि स्वयंपूर्ण समुदाय बनला आहे. इंद्रियासाठी हे स्थान अत्यंत आदर्श ठरले आहे, कारण या भागात अनेक नवीन व्यवसाय, रिटेल आउटलेट्स आणि निवासी प्रकल्प आले आहेत.
‘सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनी’ पुरस्कार जाहीर; महावितरण ठरली अव्वल
नवी मुंबईतील सीवुड्सच्या आसपासच्या भागात मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. येथे नवीन कमर्शियल तसेच निवासी प्रकल्प उभे राहिले आहेत. या भागात स्थिर होणारी वाढती लोकसंख्या आणि व्यावसायिक जागांची उपलब्धता सीवुड्सला एक प्रमुख व्यवसायिक केंद्र बनवते. यामुळे इंद्रिया ब्रँडसाठी हे क्षेत्र एक उपयुक्त विस्तार ठरले आहे.
इंद्रिया ब्रँडने जुलै महिन्यात आपल्या पदार्पणानंतर दिल्ली, मुंबई, पुणे, जयपूर, अहमदाबाद, हैदराबाद, इंदूर आणि सुरतमध्ये एकूण १७ दालनांसह आपली उपस्थिती आणि विस्तार वेगाने वाढवला आहे. या विस्तारामुळे, इंद्रिया आता भारतभरात आपले अनोखे, शुद्ध दागिने आणि उच्च दर्जाच्या ग्राहक सेवेसाठी प्रसिद्ध आहे. ब्रँडच्या १६,००० विशेष डिझाईन केलेल्या अलंकार आणि ५,००० हून अधिक विशेष स्ट्रक्चर ग्राहकांना एक असामान्य आणि अद्वितीय अनुभव देतात.
LIC Scheme: LIC च्या ‘या’ योजनेत एकदा पैसे गुंतवा, आयुष्यभर मिळतील १२००० रुपये पेन्शन
इंद्रियाचे सीईओ संदीप कोहली यांनी म्हटले आहे, “मुंबई हे शहर जुन्या आणि आधुनिकतेचे सुंदर मिश्रण आहे. येथे हस्तकला आणि कालातीत सौंदर्याचा गोडवा आहे. आम्ही मुंबईतील आमच्या तिसऱ्या दालनासह, वारसा आणि नवकल्पनांना खरोखरच महत्त्व देणाऱ्या शहरात आमची सिग्नेचर डिझाईन, अपवादात्मक ग्राहक सेवा तसेच अस्सल प्रादेशिक कलाकृती आणत आहोत.”