अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजार कोसळला की वधारला? वाचा... सोमवारी कोणत्या शेअर्समध्ये झाली वाढ!
मंगळवारी अर्थात 23 जुलै रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्याआधी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली आहे. आज बाजारात मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्ये जोरदार खरेदी दिसून आली. विशेष म्हणजे अर्थसंकल्पापूर्वी ऑटो शेअर्समध्येही खरेदी दिसून आली आहे. आजच्या व्यवहाराअंती मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स 102.57 अंकांच्या घसरणीसह 80,502 अंकांवर बंद झाला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी 21.65 अंकांच्या घसरणीसह 24,509.25 अंकांवर बंद झाला आहे.
कोणत्या शेअर्समध्ये वाढ?
आज शेअर बाजारात प्रामुख्याने एनटीपीसी 2.58 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 2.34 टक्के, एचडीएफसी बँक 2.15 टक्के, टाटा स्टील 1.87 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 1.87 टक्के, पॉवर ग्रिड 1.76 टक्के, टाटा मोटर्स 1.42 टक्के, सन फार्मा 1.01 टक्के, मार्झुटी 1.01 टक्के हे शेअर्स वाढीसह बंद झाले आहेत. याउलट इन्फोसिस 0.87 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला आहे. याउलट घसरणाऱ्या समभागांमध्ये रिलायन्सचा शेअर 3.46 टक्क्यांच्या घसरणीसह, कोटक महिंद्रा बँक 3.30 टक्क्यांच्या घसरणीसह, आयटीसी 1.75 टक्क्यांच्या घसरणीसह, एसबीआय 1.21 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला आहे.
अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजार कोसळेल की सुधारेल? वाचा… काय सांगितलंय तज्ज्ञांनी?
कोणत्या क्षेत्रातील शेअर्समध्ये उसळी?
आज अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी शेअर बाजारात ऑटो, फार्मा, धातू, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर्स तेजीसह बंद झाले आहेत. याउलट तेल आणि वायू, आयटी, ऊर्जा, मीडिया, रिअल इस्टेट, एफएमसीजी क्षेत्रातील शेअर्स घसरणीसह बंद झालेले पाहायला मिळाले. आज शेअर बाजारात मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्ये जोरदार खरेदी दिसून आली आहे.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत घट
आज शेअर बाजारात मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सच्या वाढीमुळे गुंतवणूकदारांची संपत्तीत घट झाली आहे. मुंबई शेअर बाजारात (बीएसई) सूचीबद्ध शेअर्सचे मार्केट कॅप 448.38 लाख कोटी रुपयांवर बंद झाले आहे. जे मागील ट्रेडिंग सत्रात 446.38 लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते. अर्थात आजच्या ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.