Donald Trump यांचा 'हा' एक निर्णय आणि भारत झाला मालामाल तर पाकिस्तान कंगाल
अनेक दिवसांपासून भारतीय रुपया हा डॉलरच्या तुलनेत सारखा घसरत होता. याचा परिणाम आपल्याला शेअर मार्केटवर सुद्धा दिसला. यामुळे भारतीय गुंतवणूकदारांमध्ये थोडी अस्थिरता वाढत चालली होती. पण अमेरिकेचे नवीन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे भारतीय रुपया पुन्हा मजबूत झाला आहे. चला या निर्णयाबद्दल जाणून घेऊया.
सलग ७ आठवड्यांपासून सुरू असलेली परकीय चलन साठ्यात ((India Foreign Exchange Reserves) घट आता थांबली आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ०.५ टक्क्यांनी मजबूत झाला आहे. २४ जानेवारी २०२५ रोजी संपलेल्या व्यापारी आठवड्यात भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ०.५ टक्क्यांनी मजबूत झाला आहे.
Budget 2025: केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ वर विविध क्षेत्रातील ‘या’ दिग्गजांनी दिल्या प्रतिक्रिया
या ताकदीमुळे, परकीय चलन साठ्यातही ५.५ अब्ज डॉलर्सची वाढ झाली. परंतु, परकीय चलन साठ्याच्या बाबतीत भारतासाठी चांगली बातमी असली तरी, शेजारील देश पाकिस्तानसाठी यासंदर्भात वाईट बातमी आहे. खरंतर, पाकिस्तानच्या परकीय चलन साठ्यात घट झाली आहे.
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत सत्ता हाती घेतल्यावर, त्यांनी ताबडतोब टॅरिफ न लादण्याचा निर्णय घेतला. यामुळे आशियाई चलनाला दिलासा मिळाला. रुपयाच्या मजबूतीच्या अनेक कारणांपैकी हे देखील एक कारण आहे. रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २४ जानेवारी २०२५ रोजी संपलेल्या आठवड्यात भारताच्या परकीय चलन साठ्यात ५.५७४ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.
एकीकडे भारताच्या तिजोरीत डॉलर्स भरलेले आहेत, तर दुसरीकडे शेजारील देश पाकिस्तानला आजकाल परकीय चलन साठ्याची मोठी कमतरता भासत आहे. २४ जानेवारी २०२५ रोजी संपलेल्या आठवड्यात, पाकिस्तानच्या परकीय चलन साठ्यात १३७.२ दशलक्ष डॉलर्सची घट झाली. या कमतरतेमुळे, पाकिस्तानचा परकीय चलन साठा आता १६.०५२ अब्ज डॉलर्सपर्यंत कमी झाला आहे.
… तरच 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावरील टॅक्स होणार माफ; सोप्या शब्दांत समजून घ्या नक्की काय आहे गणित
भारताच्या सोन्याच्या साठ्यात आणि विशेष रेखांकन हक्कांमध्ये (SDR) अलिकडेच झालेल्या वाढीमुळे आर्थिक स्थिरता आणखी मजबूत झाली आहे. २०२५ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोने आणि मौल्यवान धातूंवरील आयात शुल्क कमी करण्याचा प्रस्ताव मांडला, ज्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत त्यांची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे.
सध्या, भारताचा सोन्याचा साठा ८०० टनांपेक्षा जास्त झाला आहे, जो जागतिक आर्थिक अनिश्चिततेमध्ये एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून उदयास आला आहे. दरम्यान, एसडीआरमध्येही वाढ झाली आहे, ज्यामुळे भारताची आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थिती मजबूत झाली आहे.