Tech Mahindra News: AI आणि ‘एंटरप्राइझ इंटेलिजेंस’वर भर; टेक महिंद्राच्या नफ्यात सातत्याने वाढ
Tech Mahindra News: तीन वर्षांपूर्वी ठरविलेल्या धोरणाचे आता सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत, जे सुधारित ऑपरेटिंग नफा आणि मोठ्या व्यवहारांमध्ये वाढ दर्शवितात, असे माहिती तंत्रज्ञान कंपनी टेक महिंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक मोहित जोशी म्हणाले. जोशी म्हणाले, जग सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित डिझाइन आणि अभियांत्रिकीसह ‘एंटरप्राइझ इंटेलिजेंस’ च्या नवीन युगाकडे वाटचाल करित आहे. कंपनीचे लक्ष आता स्थिरीकरणापासून जलद वाढीकडे वळत आहे. ऑक्टोबर-डिसेंबर-२०२५ च्या तिमाहीत कंपनीचे नफा जवळजवळ एक टक्क्याने वाढून १३.१ टक्के झाला आहे.
हे देखील वाचा: Todays Gold-Silver Price: सोनं-चांदीच्या दरात घसरण सुरूच; आजच्या किंमती वाचून ग्राहक झाले आनंदी
हा सलग नववा तिमाही होता, ज्यामध्ये नफा सुधारला आहे. गेल्या १२ महिन्यांत आमची व्यावसायिक कामगिरी बळकट झाली आहे, मोठ्या डीलसह एकूण डील व्हॉल्यूममध्ये ४८ टक्क्यांनी वाढ झाली. क्लायंट आमच्या स्पष्ट रणनीती, शिस्तबद्ध डील निवड आणि एआय केंद्रित परिवर्तन, अभियांत्रिकी आणि उत्पादन सेवा, दूरसंचार आधुनिकीकरण आणि ग्लोबल कॉम्पिटन्स सेंटर्स (जीसीसी) मधील क्षमतांचा विस्तारांना सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. विश्लेषकांचे म्हणणे असे की, टेक महिंद्राची मार्जिन कामगिरी अपेक्षेपेक्षा अधिक आहे. पीएल कॅपिटलने एका अहवालात म्हटले की, १३.१ टक्के मार्जिन त्यांच्या १२.६ टक्क्यांच्या अंदाजापेक्षा अधिक आहे.
हे देखील वाचा: Stock Market Today: आजचा शेअर बाजार तेजीत? तज्ज्ञांचे दिले सकारात्मक संकेत, या शेअर्सकडे गुंतवणूकदारांचे लक्ष
अहवालानुसार, ही सुधारणा प्रामुख्याने ‘प्रोजेक्ट फोर्टियस’ अंतर्गत वाढीव कार्यक्षमता व चलन विनिमय लाभामुळे सुधारित मार्जिनमुळे झाली आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या नवीन डीलचे एकूण कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू (टीसीव्ही) १.०९ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढली, जी गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक तिमाहीतील बुकिंग आहे. एका वर्षापूर्वीच्या तुलनेत ४७ टक्के वाढ आहे. जोशी म्हणाले की, कंपनीच्या नवीन धोरणाचे गेल्या १८ महिन्यामध्ये ठोस परिणाम दिसू लागले आहे. कंपनी आता जलद वाढीच्या पुढील टप्प्याकडे वाटचाल करत आहे. एप्रिल २०२४ मध्ये, कंपनीने तीन वर्षांची परिवर्तन योजना, ‘व्हिजन २०२७’ जाहीर केले, ज्याचा उद्देश तिचा पोर्टफोलिओ मजबूत करणे, कामकाज सोपे करणे आणि ग्राहक, कर्मचारी आणि गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण करणे हा होता.






