भारत पाकिस्तानमधील तणाव वाढता सोन्याच्या दरात मोठी वाढ, काय आहेत आजच्या किंमती? (फोटो सौजन्य-X)
Today Gold Rate News In Marathi: भारतातील सोन्याच्या किमतीत आज पुन्हा एकदा बदल दिसून आला आहे. सण आणि लग्नसराईच्या काळात लोक सोने खरेदी करण्याचा विचार करत आहेत, त्यामुळे दैनंदिन किमती जाणून घेणे महत्त्वाचे झाले आहे. देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये सोन्याच्या किमतीत थोडाफार बदल होत राहतो आणि हा बदल अनेक कारणांमुळे होतो – जसे की आंतरराष्ट्रीय बाजार, डॉलरची किंमत, मागणी आणि पुरवठा यांचा समावेश आहे. तर दूसरीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढल्यानं सोन्याच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. परिणामी राजधानी नवी दिल्लीत सोन्याचे दर 1000 रुपयांनी वाढून एक लाख रुपयांवर पोहोचले आहे.
दरम्यान गेल्या महिन्यात 22 एप्रिलला प्रतितोळा सोन्याची किंमत 1 लाखांवर पोहोचली होती. आता पुन्हा एकदा सोने जीएसटीसह लाखावर गेले आहे. वर्षाच्या शेवटी सोन्याचे दर प्रतितोळा 1 लाख 10 हजारांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. भारत-पाकिस्तान युध्द परिस्थितीचा परिणाम सोन्याच्या दरावर झाला आहे. सोन्याचे दर जीएसटीसह पुन्हा लाखावर गेले आहेत. सलग दोन दिवस सोन्याचा दरात वाढ. झाली आहे. सोने 1 लाख 10 हजारांवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोने प्रतितोळा 97 हजार 200 रुपयांवर गेले आहे.
आज भारतात २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ९,९०१ रुपये तर २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ९,०७६ रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा (ज्याला ९९९ सोने असेही म्हणतात) दर ग्रॅम ₹७,४२६ आहे. आज भारतात चांदीचा दर प्रति ग्रॅम ₹९९.१० आणि प्रति किलोग्रॅम ९९,१०० रुपये आहे.
१ ग्रॅम: ९,०७६ रुपये
८ ग्रॅम: ७२,६०८ रुपये
१० ग्रॅम: ९०,७६० रुपये
१०० ग्रॅम: ९,०७,६०० रुपये
१ ग्रॅम: ९,९०१ रुपये
८ ग्रॅम: ७९,२०८ रुपये
१० ग्रॅम: ९९,०१० रुपये
१०० ग्रॅम: ९,९०,१०० रुपये
तुम्ही स्वतः सोन्याचे नवीनतम दर देखील सहजपणे शोधू शकता. यासाठी तुम्हाला फक्त एक मिस्ड कॉल (ब्लँक कॉल) करावा लागेल. तुम्ही ८९५५६६४४३३ वर मिस्ड कॉल देऊन २२ कॅरेट सोन्याचे आणि १८ कॅरेट सोन्याचे दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच, तुम्हाला सोन्याच्या दराबाबत माहिती असलेला एसएमएस येईल.