Pakistan IMF Conditions: पाकिस्तानवर आयएमएफचा वाढला दबाव! ११ अटींनी वाढवली डोकेदुखी..; काय आहेत त्या अटी? जाणून घेऊया सविस्तर (फोटो-सोशल मीडिया)
Pakistan IMF Conditions: आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच आयएमएफने पाकिस्तानवर ७ अब्ज डॉलर्सच्या बेलआउट कार्यक्रमात नवीन ११ अटी जोडल्या असून ज्यामुळे केवळ १८ महिन्यांत एकूण ६४ अटी आल्या आहेत. पाकिस्तानमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी, साखर क्षेत्राचे उदारीकरण करण्यासाठी आणि वाढत्या रेमिटन्स खर्चाला तोंड देण्यासाठी या अटी आणल्या गेल्या आहेत. म्हणूनच आयएमएफ पाकिस्तानवर या अटींसह दबाव आणत आहे. चला जाणून घेऊया ११ अटी काय आहेत.
आयएमएफच्या ११ अटी
आयएमएफने म्हटले की, प्रशासनातील कमतरता कमी करण्यासाठी, वीज क्षेत्रातील तोटा रोखण्यासाठी, पाकिस्तानची कर यंत्रणा सुधारण्यासाठी आणि आर्थिक पुनर्प्राप्तीमध्ये अडथळा आणणाऱ्या संरचनात्मक कमतरता दूर करण्यासाठी या नवीन उपाययोजना अत्यंत आवश्यक आहेत. तसेच, आयएमएफला पाकिस्तानने साखर उद्योगावरील मजबूत असलेला प्रभाव दूर करावा आणि जून २०२६ पर्यंत पाकिस्तानला काही अटी पूर्ण कराव्या लागतील असे सांगितले. साखर बाजार उदारीकरणासाठी राष्ट्रीय धोरण तयार करावे लागेल. परवाना, किंमत नियंत्रण, आयात किंवा निर्यात परवाने आणि झोनिंगशी संबंधित सुधारणांवर सहमती दर्शवावी लागेल.
हेही वाचा : Demonetized Currency: तुमच्याकडेही नोटबंदीच्या काळातील जुन्या नोटा आहेत का? मग शिक्षेसाठी तयार राहा
पाकिस्तानने मे २०२६ पर्यंत रेमिटन्स खर्च आणि सीमापार पेमेंटसाठी संरचनात्मक अडथळ्यांचे मूल्यांकन पूर्ण करावे लागेल, कारण असा अंदाज आहे की, रेमिटन्स खर्च १.५ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतो. स्थानिक चलन बाँड बाजाराच्या विकासातील अडथळ्यांवरील एक स्वतंत्र अभ्यास सप्टेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करावा लागेल, त्यानंतर एक धोरणात्मक कृती योजना विकसित करावी लागेल. आयएमएफ पाकिस्तानच्या प्रगतीला असमान आणि अपुरे मानते, भविष्यातील निधी प्रदान करण्यापूर्वी अधिकाऱ्यांवर दबाव वाढवते. म्हणून, या ११ अटी पाकिस्तानवर लादण्यात आल्या आहेत.






