‘सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन’ने (एसजीएमए) आठव्या ‘इंटरनॅशनल युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरिंंग फेअर २०२४’चे आयोजन
मुंबई : ‘सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन’ने (एसजीएमए) आठव्या ‘इंटरनॅशनल युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरिंंग फेअर २०२४’चे आयोजन केले असून ते १८ ते २० डिसेंबर २०२४ दरम्यान बंगळूरू येथे होणार आहे. त्याचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते पहिल्या दिवशी होणार आहे. या प्रदर्शनामध्ये गणवेश क्षेत्रातील उत्पादक, पुरवठादार आणि वितरक सहभागी होणार असून या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या व्यासपीठावर त्यांना त्यांची उत्पादने सादर करण्याची संधी मिळणार आहे. ग्राहकांशी जोडले जाणे त्यांना त्याद्वारे शक्य होणार आहे. त्याशिवाय या क्षेत्रातील नवीन ट्रेंड काय आहेत, हे जाणून घेणेही शक्य होणार आहे.
120 ब्रँड होणार सहभागी
या प्रदर्शनामध्ये १२० आघाडीचे ब्रँड सहभागी होणे अपेक्षित असून गणवेश कापडाच्या १० हजारहून अधिक डिझाइन तसेच गणवेश कापडाच्या २५ हजारांहून अधिक डिझाईन व अॅक्सेसरिज या प्रदर्शनामध्ये असणार आहेत. तीन दिवस चालणारे हे प्रदर्शन गेट नंबर ८, श्रीनगर पॅलेस ग्राउंड, जयामहल, बेंगळूरू, कर्नाटक येथे होणार आहे. आंतरराष्ट्रीय युनिफॉर्म आणि गारमेंट प्रदर्शन हे सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (एसजीएमए)ने आयोजित केले आहे. एसजीएमएनेच या वार्षिक आयोजनाची संकल्पना राबविली आणि गेली सात वर्षे ती यशस्वीपणे अंमलात आणली आहे.
आनंद महिंद्रांचे भडकलेल्या ग्राहकाला उत्तर, 1991 पासून सांगितली स्टोरी, वाचा… सविस्तर!
गणवेश आणि कपड्यांसाठी उत्तम व्यासपीठ
विविध राज्यांमध्ये या वार्षिक प्रदर्शनांच्या सात आवृत्त्यांचे आयोजन केल्यानंतर युनिफॉर्म मॅन्युफक्चरर्स फेअर हे आता गणवेश आणि कापड उद्योगासाठी एक आश्वासक असे व्यासपीठ म्हणून स्थापित झाले आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून या क्षेत्राशी संबंधित घटक आणि व्यवसायांना आघाडीच्या गणवेश कापड व वस्त्र उत्पादकांशी संवाद साधण्याची संधी प्राप्त होते. त्या माध्यमातून त्यांना त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करता येतो.
या क्षेत्रातील जे विविध घटक या प्रदर्शनामध्ये सहभागी होणार आहेत त्यांच्यामध्ये शालेय गणवेश, बेल्ट व टाय, क्रीडा गणवेश, लोगो व प्रिंट, हिवाळी कपडे, महाविद्यालय गणवेश, शालेय बूट व सॉक्स, विविध गणवेशांचे कपडे, शालेय व महाविद्यालयांसाठी लागणाऱ्या बॅगा तसेच रुग्णालय गणवेश, ब्लेझर या गोष्टींच्या उत्पादकांचा समावेश आहे.
20 हजार डिझाईन्स उपलब्ध
गणवेषांचे भव्य प्रदर्शन
या प्रदर्शनामध्ये १२० हूनही अधिक ब्रँड सहभागी होणार असून एकाच छताखाली त्यांना आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन करता येणार आहे. गणवेश उत्पादनामध्ये असलेल्या जवळजवळ सर्वच कंपन्या या प्रदर्शनामध्ये सहभागी होणार आहेत. मफतलाल, काका, आणि फिझीकल यांसारखे आघाडीचे ब्रँड यात सहभागी होणार असून गणवेश कापडाची १० हजार डिझाईन आणि गणवेश वस्त्रांची २० हजार डिझाईन या प्रदर्शनात उपलब्ध असतील.
त्याशिवाय टाय, बेल्ट, शाळेचे शु, बॅगा, ब्लेझर आणि कापडासंबंधी मशीनची जी उत्पादने आहेत ती या प्रदर्शनामध्ये असतील.जगातील गणवेशाची बाजारपेठ २०२० मध्ये ६.२ अब्ज डॉलर एवढी होती ती २०२१मध्ये ८.४ अब्ज डॉलर झाली आहे आणि २०३० मध्ये ती २५ अब्ज डॉलर होणे अपेक्षित आहे, असे उद्गार प्रदर्शनचे अध्यक्ष सुनील मेंगजी यांनी काढले
ऑर्डर पूर्ण करण्यावर भर
सोलापूर येथील कापडाचे उत्पादक हे गणवेशाच्या ऑर्डर ठरलेल्या वेळेत पूर्ण करतात आणि त्याचवेळी छोट्या ऑर्डरही पटापट पूर्ण करण्यावर त्यांचा भर असतो. हे या उत्पादकांचे वैशिष्ट्य मानले जाते. त्याचमुळे दक्षिण भारतातील छोटे व्यापारी सोलापूर येथील गणवेशांमध्ये मोठ्या प्रमाणावर रस दाखवतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ एप्रिल २०१४ रोजी त्यांच्या भाषणात सोलापूर येथील वस्त्रोद्योग उद्योगामध्ये, येथील कारागीर आणि कामगारांमध्ये ऊंच भरारी घेण्याची व नव्या उंचीवर जाण्याची क्षमता आहे, असे उद्गार काढले होते.
त्यांच्या या उद्गारांनी प्रेरित होवून हे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याचे काम ‘सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन’(एसजीएमए) करत आहे. त्यानंतर दहा वर्षांनी २० जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधानांनी ‘एसजीएमए’ची स्तुती केली असून वस्त्रोद्योग वृद्धीच्या अगदी योग्य मार्गावर जात असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे सोलापूर हे संपूर्ण जगात गणवेशाचे केंद्र झाल्याचेही त्यांनी म्हटले हाेते. तसेच सोलापूरला आज जगातील गणवेशाचे केंद्र म्हणून मान्यता आहे. त्याशिवाय येथील उद्योगामध्ये जागतिक दर्जाचे गणवेश वितरीत करण्याची क्षमता आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
हिवाळ्याची सुट्टी ठरणार अजूनच मजेशीर, EaseMyTrip कडून Winter Carnival Sale ची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गौरवोद्गार
त्यानंतर १२ नोव्हेंबर २०२४ रोजी सोलापूरमध्ये एका निवडणूक प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूर हे गणवेशाचे देशातील केंद्र बनले असल्याबद्दल गौरवोद्गार काढले. “जेव्हा गणवेशाचा विषय निघतो तेव्हा देशात सोलापूरचे नाव सर्वप्रथम येते. सोलापूरला देशातील गणवेशाच्या उत्पादनाचे केंद्र बनविण्यासाठी येथील लोकांच्या अनेक पिढ्या शिवणकामात गुंतल्या आहेत,” असेही ते म्हणाले. त्यांनी पुढे असे म्हटले की, सोलापूर येथील उद्योगामध्ये हजारो लोकांना नोकऱ्या देण्याची क्षमता आणि कुवत आहे. त्यांनी येथील उत्पादन उद्योगाला पोलीस व सशस्र दलाला लागणाऱ्या गणवेशांची निर्मिती करण्याचे आवाहनही केले. त्यातून हजारो नोकऱ्या निर्माण होतील असेही ते म्हणाले. या उद्योगामध्ये २०,००० नोकऱ्या आणि ५०० नवीन उद्योगपती निर्माण करण्याची क्षमता आहे, असे ते म्हणाले.