(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Khan Sir Net Worth : प्रसिद्ध शिक्षक आणि YouTuber ‘खान सर’ सध्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. बिहारची राजधानी असलेल्या पाटणा येथे त्यांच्या कोचिंग इन्स्टिट्यूटबाहेर मोठा गदारोळ उसळला आणि त्यामुळे सध्या त्यांची ही संस्था बंद ठेवण्यात आली आहे. त्यांची अध्यापनाची अद्वितीय शैली आणि परवडणाऱ्या फीमुळे त्यांनी केवळ देशातच नाही तर जागतिक स्तरावरही आपली एक वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी ते आधारस्तंभ म्हणून काम करता. त्यामुळे त्यांची लोकप्रियता बरीच मोठी आहे. पण तुम्हाला माहिती आहे का खान सरांना 107 कोटींची ऑफर आली होती. एका कार्यक्रमादरम्यान, खान सर यांनी स्वतःच खुलासा करत याबाबत माहिती दिली होती. पण त्यांनी ही ऑफर नाकारली. मग आता खान सर किती कमवतात जाणून घेऊयात नेमकी काय आहे नेटवर्थ?
रिपोर्टनुसार, खान सरांचे खरे नाव फैजल खान आहे. त्यांचा जन्म १९९३ मध्ये उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे झाला. त्यांनी इयत्ता १० वीपर्यंतचे शालेय शिक्षण एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून पूर्ण केले आणि त्यानंतर हिंदी माध्यमाच्या शाळेतून १२ वीची परीक्षा उत्तीर्ण केली. यानंतर, त्यांनी अलाहाबाद कॉलेजमधून B.Sc., M.Sc. आणि भूगोलातील पदव्युत्तर पदवी संपादन केली. आज ते ‘खान GS रिसर्च सेंटर’ नावाची एक कोचिंग संस्था चालवतात. याव्यतिरिक्त, २०१९ मध्ये त्यांनी एक YouTube चॅनेल सुरू केले. लॉकडाऊनच्या काळात, हे चॅनेल विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरलं आणि आज त्यांच्या YouTube चॅनेलवर लाखो ‘व्ह्यूज’ आणि लाखो ‘सबस्क्रायबर्स’ आहेत.
खान सरांनी आपली मालमत्ता कधीही सार्वजनिकरित्या जाहीर केलेली नाही. पण प्रसारमाध्यमांच्या वृत्तांनुसार, त्यांची एकूण संपत्ती ५ कोटी ते २० कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. काही वृत्तांमध्ये तर असाही दावा करण्यात आला आहे की, त्यांची एकूण मालमत्ता अंदाजे ४१ कोटी रुपयांपर्यंत आहे. ते दररोज ७०,००० रुपयांपर्यंत कमाई करतात, असेही सांगितले जाते. याचा अर्थ असा की, त्यांचे मासिक उत्पन्न १५ लाख ते २० लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते. ही कमाई त्यांना YouTube, ऑनलाइन कोर्सेस आणि कोचिंग शुल्कातून मिळते.
त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत त्यांचे Khan GS Research Centre हे YouTube चॅनेल आहे. या चॅनेलचे सुमारे २५ दशलक्ष म्हणजेच २.५ कोटी सबस्क्रायबर्स आहेत. जाहिरातींमधून मिळणारे उत्पन्न, विविध ब्रँड्ससोबतच्या भागीदारी आणि सुपर चॅट्स सारख्या प्रकारांमध्ये प्रेक्षकांकडून मिळाणाऱ्या योगदानातून, त्यांची मासिक कमाई १० लाख ते २० लाख रुपयांच्या दरम्यान असते. त्यांची कोचिंग संस्था UPSC परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ७०,००० ते १ लाख रुपयांपर्यंत शुल्क आकारते. याव्यतिरिक्त, ते ११ वी आणि १२ वीच्या परीक्षांची, तसेच NEET प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष बॅचेस देखील चालवतात.
The Great Indian Kapil Show या कार्यक्रमात हजेरी लावल्यानंतर खान सरांनी एक मोठा खुलासा केला होता. त्यांनी सांगितले की, त्यांना १०७ कोटी रुपयांची एक ऑफर मिळाली होती. जी ऑफर त्यांनी नाकारली. खान सरांनी सांगितले की, त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांना अनेक कठीण संघर्षांना सामोरे जावे लागले होते. त्यांनी नमूद केले की, आजही हजारो विद्यार्थ्यांना अशाच प्रकारच्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. नेमक्या याच कारणामुळे, केवळ स्वतःच्या आर्थिक फायद्यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा, विद्यार्थ्यांना परवडणारे शिक्षण उपलब्ध करून देण्याला त्यांनी अधिक प्राधान्य दिले.






