(फोटो सौजन्य: pinterest)
केंद्र सरकारने देशातील Wholesale Inflation म्हणजे घाऊक महागाईच्या आकलनाबाबत एक मोठा आणि ऐतिहासिक बदल जाहीर केला आहे. सरकारने घाऊक किंमत निर्देशांकाचे WPI आधार वर्ष 2011-12 ते 2022-23 बदलण्यास मान्यता दिली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, नवीन मालिका अधिकृतपणे 15 जून 2026 रोजी लाँच केली जाईल. यासोबतच, जागतिक मानकांचा अवलंब करून, भारत प्रथमच प्रोड्यूसर प्राइस इंडेक्स PPI जारी करणार आहे. नेमके काय होणार आहेत बदल? आणि यामुळे काय परिणाम होऊ शकतात? समजून घेऊयात.
Share Market Today: अशी होणार आज शेअर बाजाराची सुरुवात! तज्ज्ञांनी दिला सावध राहण्याचा इशारा
भारतामध्ये, अनेक बिजनेस कॉन्ट्रॅक्ट्समध्ये आणि किंमतवाढीच्या प्रकरणांमध्ये ‘घाऊक किंमत निर्देशांक’ (WPI) चा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. परिणामी, सरकार हा निर्देशांक अचानकपणे बंद करणार नाही.
नवीन series सुरुवात करण्याची तारीख १५ जूनपासून पुढील पाच वर्षांपर्यंत WPI आणि PPI हे दोन्ही निर्देशांक एकाच वेळी जारी केले जातील. पाच वर्षांनंतर, WPI पूर्णपणे बंद केला जाईल; यामुळे उद्योग क्षेत्राला आणि वापरकर्त्यांना WPI कडून PPI कडे वळण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.
WPI कडून PPI कडे होणारे हे स्थित्यंतर फार महत्त्वाचं आहे. कारण जागतिक स्तरावर वापरल्या जाणाऱ्या सर्वोत्तम कार्यपद्धतींशी सुसंगत आहे. यामुळे हे समजण्यास मदत होईल की कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींचा बोजा उत्पादक, अंतिम उत्पादनांवर (finished goods) कशा प्रकारे हस्तांतरित करतात त्यामुळे हे अत्यंत उपयुक्त आहे.
पहिल्या टप्प्यात, उपलब्ध माहितीच्या आधारे, सात प्रमुख सेवांसाठी ‘सेवा उत्पादक किंमत निर्देशांक’ Service PPI देखील प्रसिद्ध केलं जाईल.
बँकिंग
सिक्योरिटीज ट्रांजेक्शन
विमा
पेंशन फंड मैनेजमेंट
रेल्वे
हवाई प्रवासी वाहतूक
टेलीकॉम
नवीन WPI सिरीजमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या वस्तूंची संख्या ६९७ वरून ९५७ पर्यंत वाढवण्यात आली आहे. याचा अर्थ असा की, आता घाऊक महागाईचे मोजमाप करण्यासाठी उत्पादनांच्या अधिक मोठ्या प्रमाणात किमतींचा मागोवा घेतला जाईल.
पहिल्यांदाच, सौर, पवन आणि अणुऊर्जेसारखे आधुनिक व पर्यायी ऊर्जा स्रोतांना Electricity गटामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.
कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू यांना ‘प्राथमिक वस्तू’ या श्रेणीमधून काढून ‘इंधन आणि ऊर्जा’ या विभागात हलवण्यात आले आहे. कोळसा आणि पेट्रोलियम उत्पादने या गटामध्ये आधीपासूनच समाविष्ट असल्याने, या बदलामुळे विविध घटकांमध्ये अधिक सुसंगती निर्माण होईल.
WPI आणि Output PPI या दोन्ही निर्देशांकांची गणना मासिक आधारावर केली जात आहे. १५ जून रोजी, मे २०२६ च्या तात्पुरत्या डेटासोबतच, मागील ३७ महिन्यांचा म्हणजेच एप्रिल २०२३ ते एप्रिल २०२६ पूर्व-डेटा देखील प्रसिद्ध केला जाईल. सरकारच्या मते, या नवीन मालिकेअंतर्गत डेटाची गणना करण्याची पद्धत आणि किमतींविषयीचा उपलब्ध नसलेला डेटा भरून काढण्याची प्रक्रिया या दोन्ही बाबींमध्ये, पूर्वीच्या कार्यपद्धतींच्या तुलनेत आधुनिकीकरण करण्यात आले आहे.






