Stock Market Today: गुंतवणूकदारांनो सावध व्हा! सपाट पातळीवर होणार बाजाराची सुरुवात, तज्ज्ञांनी दिला इशारा
Todays Gold-Silver Price: सोन्याच्या भावात चढऊतार सुरुच! एका क्लिकवर जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
गुरुवारी, भारतीय शेअर बाजाराने तीन सत्रांच्या घसरणीला ब्रेक लावला आणि शेअर बाजार वाढीसह बंद झाला. सेन्सेक्स ३ ९ ७.७४ अंकांनी म्हणजेच ०.४९% ने वाढून ८२,३०७.३७ वर बंद झाला, तर निफ्टी ५० १३२.४० अंकांनी म्हणजेच ०.५३% ने वाढून २५,२८९.९० वर बंद झाला. गुरुवारी बँक निफ्टी निर्देशांक ३९९.८० अंकांनी किंवा ०.६८% ने वाढून ५९,२००.१० वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest)
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या वेल्थ मॅनेजमेंटमधील डेरिव्हेटिव्ह्ज अँड टेक्निकल्स हेड चंदन टपारिया यांनी आज २३ जानेवारी रोजी तीन स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे. चंदन टपारिया यांनी शिफारस केलेल्या स्टॉक्समध्ये अशोक लेलँड, भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL) आणि APL अपोलो ट्यूब्सचे शेअर्स यांचा समावेश आहे. तर रेलिगेअर ब्रोकिंग येथील संशोधन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी अल्पकालीन खरेदीसाठी काही स्टॉक्सची शिफारस केली आहे. मिश्रा यांनी शिफारस केलेल्या शेअर्समध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स, गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स, जिंदाल स्टील या शेअर्सचा समावेश आहे.
चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांसाठी पाच ब्रेकआउट स्टॉक्सची शिफारस केली आहे. सुमित बगडिया यांनी शिफारस केल्यानुसार गुंतवणूकदार आज एपीएल अपोलो ट्यूब्स, अशोक लेलँड, फेडरल बँक, नेस्ले इंडिया आणि कॅम्पस अॅक्टिव्हवेअर या शेअर्सवर फोकस करू शकतात. प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधन उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आज गुंतणूकदारांना खरेदी करण्यासाठी तीन स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये लार्सन अँड टुब्रो, सीक्वेंट आणि भारत फोर्ज या शेअर्सचा समावेश आहे.






