Share Market Today: हिरव्या रंगात उघडणार बाजार! कोणते स्टॉक्स देणार कमाईची संधी? तज्ज्ञांनी दिले संकेत
गुरुवारी, निर्देशांकातील निवडक अव्वल कंपन्यांमध्ये नफावसुली झाल्यामुळे भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स १३५.०३ अंकांनी, म्हणजेच ०.१८ टक्क्यांनी घसरून ७५,१८३.३६ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ४.३० अंकांनी, म्हणजेच ०.०२ टक्क्यांनी घसरून २३,६५४.७० वर स्थिरावला. गुरुवारी बँक निफ्टी निर्देशांक १२२.८० अंकांनी, म्हणजेच ०.२३% ने घसरून ५३,४३९.४० वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest)
निओट्रेडरचे सह-संस्थापक आणि स्टॉक रिसर्च प्लॅटफॉर्म मार्केटस्मिथ इंडियाचे राजा व्यंकटरमण यांनी आजच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच शेअर्सची खरेदी करण्याची शिफारस केली आहे. ज्यामध्ये आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेड, मेट्रो ब्रँड्स लिमिटेड, ग्रेट ईस्टर्न शिपिंग कंपनी लिमिटेड, संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड आणि लुमॅक्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांचा समावेश आहे. आजच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार सन फार्मा, हिंडाल्को, आयशर मोटर्स, टॉरेंट फार्मा, एनटीपीसी ग्रीन, आयटीसी, मारुती सुझुकी, नायका, गेल, टाटा स्टील, होनासा कंझ्युमर, एलजी इलेक्ट्रॉनिक्स, ऑरोबिंदो फार्मा या शेअर्सवर त्यांचे लक्ष केंद्रीत करू शकतात.
चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांच्या मते आज गुंतवणूकदार ५ शेअर्स खरेदी करण्याचा विचार करू शकतात. ज्यामध्ये डॉ. अग्रवाल हेल्थ केअर, नॉलेज मरीन अँड इंजिनिअरिंग वर्क्स, जम्मू अँड काश्मीर बँक, लिंकन फार्मास्युटिकल्स आणि आरती इंडस्ट्रीज यांचा समावेश आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या वेल्थ मॅनेजमेंट, डेरिव्हेटिव्हज अँड टेक्निकल्सचे प्रमुख चंदन तापारिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज , केईआय इंडस्ट्रीज आणि संवर्धन मदरसन इंटरनॅशनल या शेअर्सची निवड केली आहे.






