RBI Banking Rules: आरबीआयचा कडक इशारा! विश्वास टिकवायचा असेल तर प्रशासनात शिस्त हवी
RBI Banking Rules: भारतीय रिझर्व्ह बँकेने शहरी सहकारी बँकांना (यूसीबी) स्पष्ट केले आहे की सहकारी बँकिंग क्षेत्राने त्यांची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाच्या उच्च मानकांचे पालन केले पाहिजे. मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी अशा बँकांना मालमत्तेच्या गुणवत्तेवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आणि मजबूत अंडररायटिंग पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन केले. हे निर्देश मुंबईत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत जारी करण्यात आले, जिथे गव्हर्नरने निवडक यूसीबीच्या अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना संबोधित केले.
हे देखील वाचा: Union Budget 2026: अर्थसंकल्प 2026 गृहनिर्माण मागणी आणि शहरी विकास टिकवण्यासाठी विकासकांकडून धोरणात्मक पाठिंब्याची मागणी
आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी स्पष्ट केले की यूसीबी केवळ कर्ज वाटप करण्यापुरते मर्यादित नाहीत, तर त्या कर्जाची गुणवत्ता सुनिश्चित करण्याची जबाबदारी देखील त्यांच्यावर आहे. त्यांनी मालमत्तेच्या गुणवत्तेचे परिश्रमपूर्वक निरीक्षण करण्याच्या गरजेवर भर दिला. बँकिंग क्षेत्रातील वाढत्या जोखमीदरम्यान गव्हर्नरांचे हे विधान महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी सांगितले की बुडीत कर्जे किंवा एनपीए सारख्या समस्या टाळण्यासाठी मजबूत अंडररायटिंग पद्धतींचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे. तसेच, व्यवसाय पूर्णपणे विश्वासावर आधारित आहे, गव्हर्नर मल्होत्रा यांनी बँकर्सना ग्राहक केंद्रित दृष्टिकोन स्वीकारण्याचा सल्ला दिला. या क्षेत्रात ग्राहकांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी नैतिक पद्धती राखणे आणि वेळेवर तक्रार निवारण करणे आवश्यक आहे यावर त्यांनी भर दिला.
हे देखील वाचा: India-EU FTA: ‘Mother Of All Deals’ पूर्णत्वाकडे; भारताची अर्थकारणात मोठी झेप, जागतिक अर्थव्यवस्थेत 25% वाटा अन् निर्यातीत वाढ
यामध्ये आरबीआयचे एकच हेतु आहे की, सध्याच्या काळात डिजिटल फसवणूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे; आणि या फसवणुकीला आळा घालण्यासाठी कामाच्या पद्धतीत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. तसेच, आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी बँकाना थोडक्यात क्रेडिट प्रणाली मजबूत करण्यावर भर द्यायचे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे ग्राहकांच्या व्यवहारात सुरक्षितता आणि जलदपणा कशी येऊ शकते, यावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले आहे.
नियामक संस्थांना त्यांच्या ग्राहकांच्या गरजा समजून घेऊन त्यावर त्यांना संरक्षण देणे महत्वाचे आहे. तसेच डिजिटल फसवणुकीचा सामना करण्यासाठी बँकांच्या तंत्रज्ञानात सुधारणा करणे देखील महत्वाचे असल्याचे संजय मल्होत्रा यांनी सांगितले आहे.






