नक्की काय आहे 'ब्लू आधार कार्ड'? (Photo Credit - X)
ब्लू आधार कार्ड म्हणजे काय?
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) नवजात बालकांपासून ते ५ वर्षांखालील मुलांसाठी हे निळ्या रंगाचे आधार कार्ड जारी करते. यालाच ‘बाल आधार’ असेही म्हणतात. लहान मुलांसाठी आधार बनवण्याची प्रक्रिया आता अधिक सोपी झाली आहे.
ब्लू आधार कार्डसाठी अर्ज कसा करावा? (Step-by-Step)
१. वेबसाइटला भेट द्या: सर्वात आधी UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
२. अपॉइंटमेंट बुक करा: “My Aadhaar” टॅबमध्ये जाऊन “Book an Appointment” हा पर्याय निवडा.
३. केंद्र निवडा: तुमचे शहर आणि जवळचे आधार सेवा केंद्र निवडून ‘Child Aadhaar Enrollment’ वर क्लिक करा.
४. नोंदणी: तुमचा मोबाईल नंबर टाका, त्यावर आलेला OTP प्रविष्ट करा आणि अपॉइंटमेंटची वेळ निश्चित करा.
५. कागदपत्रे: निश्चित केलेल्या दिवशी मुलाला घेऊन आधार केंद्रावर जा. सोबत मुलाचा जन्म दाखला आणि आई किंवा वडिलांचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
६. प्रक्रिया: केंद्रावर पालकांचे बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन केले जाते आणि मुलाचा फक्त फोटो काढला जातो.
वयोमर्यादा आणि महत्त्वाची वैशिष्ट्ये
किमान वय: यासाठी वयाची कोणतीही अट नाही; तुम्ही अगदी नवजात बाळाचेही आधार कार्ड बनवू शकता.
बायोमेट्रिक्स: ५ वर्षांखालील मुलांच्या बोटांचे ठसे किंवा डोळ्यांचे स्कॅनिंग (Biometric) घेतले जात नाही. त्यांचे कार्ड पालकांच्या आधारशी लिंक असते.
कार्ड डिलिव्हरी: प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर साधारण ६० ते ९० दिवसांत आधार कार्ड तुमच्या पत्त्यावर घरपोच येते.
भविष्यात अपडेट करणे आवश्यक
लक्षात ठेवा की, हे निळे आधार कार्ड मुलाचे वय ५ वर्षे आणि १५ वर्षे पूर्ण झाल्यावर अपडेट करणे आवश्यक असते. यावेळी मुलाचे बायोमेट्रिक्स (ठसे आणि फोटो) घेतले जातात, त्यानंतरच ते आधार कार्ड पुढील आयुष्यासाठी वैध ठरते.






