कोल्ड्रिंक किंवा आईस्क्रिमपेक्षा अनेकदा बाहेर पडल्यावर तहान लागलीच तर उसाचा रस पिणारं लाखो मंडळी आहेत. सारईचं ऊन असो किंवा ऑक्टोबर हिट उन्हाळ्यात प्रत्येकाला हवाहवासा वाटतो तो म्हणजे ऊसाचा रस. पण तुम्ही कधी विचार केलाय का की प्रत्येक ऊसाचा रस मिळतो त्या सेंटरचं नाव हे कानिफनाथच का असतं, याचा संबंध थेट अध्यात्माशी आहे कसं तर चला जाणून घेऊयात..
हिंदू धर्मात नवनाथ संप्रदाय आहे त्या संप्रदायातील नऊ नाथांपैकी एक आहेत ते कानिफनाथ. तर गोष्ट अशी की, साधारण 90 ते 80 वर्षांपूर्वी पुण्यातून या कथेला सुरुवात होते. पुरंदर जिल्हातील एक गाव त्याचं नाव बोपगाव. या ठिकाणी सर्वात जास्त वास्तव्य होतं ते शेतकरी वर्गाचं. बोपगावचा परिसर हा अत्यंत दुष्काळी पट्टा. पण जो हालाकीच्या परिस्थितीवर मात करत नाही तो शेतकरी कसला. अवघा दुष्काळी पट्टा मिळेत तशा पाण्यात इथला बळीराजा कसाबसा उसाचं पिक घेत होता. आतासारखं पुर्वी साखर कारखाना तितकाचा भरभराटीला आलेला नव्हता त्याामुळे ऊस उत्पादकाला पाहिजे तसा बाजारात नफा होत नव्हता.
अशातच नोकरीसाठी मुंबईला आलेल्या गावातील एका तरुणाच्या लक्षात आलंप की, मुंबईत ऊसाला मोठी मागणी आहे. या मोठाल्या शहरात ऊसाचे बारिक बारिक तुकडे करुन तेे विकले जातात. बस्सं हीच खरी मुहुर्तमेढ रोवली गेली. या तरुणाने शक्कल लढवली आणि प्रत्येक ठिकाणी ऊस विकण्यापेक्षा एकाच ठिकाणी याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद कसा मिळेल याची युक्ती त्याला सुचली आणि त्याने रसवंती गृह सुरु केलं. याचा डंका संपूर्ण पुरंदर तालुक्यात पसरला. तिथला प्रत्येक शेतकरी महाराष्ट्रात आपला ऊस विकला जावा म्हणून विखुरला गेला.
त्यानंतर पुरंदर तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याने महाराष्ट्रात मिळेल तिथे आणि शक्य तिथे स्वत:चं सरवंतीगृ सुरु केलं. पण प्रश्व हाच उरतो की, कानिफनाथ नावचं का ? याचं उत्तर देखील पुरंदर तालुक्यात आहे. नावनाथ संप्रदायातील नाथ म्हणजे कानिफनाथ यांचं मंदिर पुरंदरच्या एका टेकडीवर आहे. संपूर्ण तालुका या कानिफनाथांचा भक्त. त्याच्या अनुषंगाच्या आधारे हत्तीला ऊस खूप आवडतो आणि कानिफनाथांचा अवतार हा हत्तीच्या कानातून निर्माण झाला असं म्हटलं जातं. त्यामुळे पुरंपदरच्या प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या रसवंती गृहाचं नाव कानिफनाथ ठेवलं आणि याची किर्ती हळूहळू महाराष्ट्रभर परसत गेली.