Tech Tips: Smartwatch मधील ग्रीन लाईटचं रहस्य आलं समोर! वाचून तुम्हीही व्हाल थक्का
अॅपलची महागडी स्मार्टवॉच असो नाही तर बजेट फ्रेंडली सेगमेंटमध्ये उपलब्ध असलेले स्मार्टवॉच, प्रत्येकामध्ये ग्राीन लाईटचा वापर केला जातो. मात्र आता प्रश्न असा आहे की, बजेट फ्रेंडली स्मार्टवॉचपासून अगदी हजारो रुपयांच्या महागड्या स्मार्टवॉचमध्ये देखील ग्राीन लाईटचाच वापर का केला जातो? यामागे वैज्ञानिक कारण लपलेलं आहे. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.
याचं थेट उत्तर आहे की, ग्रीन लाईटच्या मदतीने पल्स डिटेक्ट करणं सोपं होतं. खरं तर यामागील विज्ञान अतिशय गुंतागुंतीचे आहे. पल्स मोजण्यासाठी स्मार्टवॉच फोटोप्लेथिसमोग्राफी प्रोसेसचा वापर करते. या तंत्रज्ञानामुळे समजते की, टिश्यू आणि त्वचेमधील रक्ताच्या प्रमाणात किती बदल झाला आहे. जेव्हा त्वचा आणि शरीरातील दुसऱ्या अवयवांपर्यंत रक्त पोहोचते, हृदयाच्या ठोक्याबरोबर केशवाहिन्या प्रसरण पावतात आणि आकुंचन पावतात. ही सर्व प्रक्रिया सुरु असताना स्मार्टवॉच त्वचेवर प्रकाश टाकते आणि किती प्रकाश परत परावर्तित होतो याची नोंद करते. ही संख्या नंतर स्क्रीनवर वाचता येण्याजोग्या स्वरूपात दर्शविली जाते. (फोटो सौजन्य – Pinterest)
रक्तामध्ये हीमोग्लोबिन असते, जे ऑक्सीजनच्या संपर्कात येताच लाल होते. हे जास्तीत जास्त लाईट शोषून घेते आणि विशिष्ट तरंगलांबीचा लाईट परावर्तित म्हणजेच रिफ्लेक्ट करते. कोणतेही लाल ऑब्जेक्ट हिरव्या रंगाची लाइट पूर्णपणे शोषून घेते. यामुळेच जेव्हा एखादी केशिका रक्ताने भरलेली असते, तेव्हा ती हिरवा प्रकाश पूर्णपणे शोषून घेते. यामुळे स्मार्टवॉचला नोंद ठेवणं सोपं जात की, केशिका केव्हा रक्ताने भरलेली आहे आणि केव्हा रिकामी आहे. याशिवाय, हिरव्या रंगांची लाईट त्वचेमध्ये तितकी खोलवर जाऊ शकत नाही, जितक्या इतर रंगांच्या लाईट जाऊ शकतात. त्यामुळे, स्मार्टवॉच शरीराच्या पृष्ठभागावरूनच रीडिंग घेते आणि अचूक मोजमापाची नोंद ठेवते.
Tech Tips: ‘Restart’ ची सवय अन् स्मार्टफोनचा परफॉर्मंस होईल दमदार! जाणून घ्या गेमचेंजर फायदे
स्मार्टवॉचमध्ये केवळ हिरव्या रंगाची लाईटच वापरली जाते, असे नाही. हिरव्या रंगासोबतच कंपनी इतर मोजमाप करण्यासाठी वेगळ्या रंगाच्या लाईटचा वापर करते. ब्लड ऑक्सीजन मोजण्यासाठी स्मार्टवॉच लाल रंगांच्या लाईटचा वापर करते. हे मोजमाप पूर्णपणे वेगळ्या प्रोसेसवर आधारित असते. त्यामुळे यामध्ये हिरव्या रंगाच्या लाईटचा वापर होत नाही.






