फोटो सौजन्य: @vipulthesharma (X.com)
पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तनामधील संबंध तणावपूर्ण झाले होते. यानंतर भारतीय सैन्याकडून ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले होते. ज्यामध्ये पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उध्वस्त करण्यात आली होती. यानंतर पाकिस्तानने देखील त्यांची काही क्षेपणास्त्र सीमालगतच्या भारतीय शहरांवर डागली होती. यामुळे काही दिवस दोन्ही देशात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पण आज आपण एका हिंदू महिलेबाबत जाणून घेणार आहोत, जी आता बलुचिस्तानमध्ये असिस्टंट कमिश्नर म्हणून कार्यरत झाली आहे.
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातून एक बातमी समोर आली आहे ज्याने तेथील लोकांची मने जिंकली आहेतच पण संपूर्ण देशातील अल्पसंख्याक समुदायासाठी आशेचा किरणही आणला आहे. बलुचिस्तानच्या चगाई जिल्ह्यातील नोशकी शहरातील रहिवासी कशिश चौधरी पाकिस्तानच्या हिंदू महिला समुदायातील पहिल्या असिस्टंट कमिश्नर बनल्या आहेत. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी हा टप्पा गाठून कशिशने एक आदर्श निर्माण केले आहे.
IPS Success Story: डांसमध्ये हुशार, ऍक्टिंगमध्ये अव्वल! मग कशी बनली ‘Lady Singham’? नक्की वाचा
कशिशने बलुचिस्तान पब्लिक सर्व्हिस कमिशन (BPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊन हे यश मिळवले आहे. तिच्या प्रवासात तिचा उत्साह दिसून येतोच, पण तो अल्पसंख्याक आणि महिलांसाठी प्रेरणादायी देखील आहे. विशेष म्हणजे बलुचिस्तानसारख्या अशांत भागात एखादी महिला इतक्या उच्च पदावर पोहोचते,ही खूप मोठी गोष्ट आहे.
कशिशचे वडील गिरधारी लाल, जे एक सामान्य व्यापारी आहेत, ते म्हणतात की माझ्या मुलीने तिच्या कठोर कष्टाने हे स्थान मिळवले आहे याचा मला अभिमान आहे. लहानपणापासूनच तिला अभ्यासासोबत आपल्या समाजासाठी काहीतरी करायचे होते.
रिपोर्ट्सनुसार, या परीक्षेची तयारी करण्यासाठी कशिशने तीन वर्षे दररोज 8 तास अभ्यास केला. तिने आपल्या यशाचे श्रेय शिस्त, कठोर परिश्रम आणि समाजसेवेच्या भावनेला दिले आहे. बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनीही कशिश यांची भेट घेतली आणि तिला “राज्य आणि संपूर्ण देशासाठी अभिमानाचे प्रतीक” असे वर्णन केले.
दररोज दहा रुपये कमवण्यापासून ते लाखोंचा पगार घेण्यापर्यंतचा प्रवास! IAS अधिकारी राम यांची संघर्षकथा
कशिशच्या आधीही पाकिस्तानातील अनेक हिंदू महिलांनी प्रशासकीय सेवांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. 2022 मध्ये मनीष रोपेता कराचीच्या पहिल्या हिंदू महिला एसपी बनल्या. पुष्पा कुमारी कोहली सिंध पोलिसात सब-इन्स्पेक्टर बनल्या. 2019 मध्ये सुमन पवन बोडानी या शाहदादकोटच्या पहिल्या हिंदू महिला सिव्हिल जज बनल्या.