फोटो सौजन्य - Social Media
इंजिनियरिंगची पदवी पूर्ण केलेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या नवरत्न कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) तर्फे ट्रेनी इंजिनियर-I पदांसाठी भव्य भरती जाहीर करण्यात आली आहे. 24 सप्टेंबर 2025 रोजी या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली असून, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांना अर्ज करण्याची अंतिम मुदत 7 ऑक्टोबर 2025 आहे.
इंजिनियरिंग पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी संधी निर्माण झाली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या नवरत्न कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) तर्फे ट्रेनी इंजिनियर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण 610 जागा भरल्या जाणार आहेत. इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, कंप्यूटर सायन्स आणि इलेक्ट्रिकल या शाखांतील पदवीधर उमेदवारांना या भरतीत अर्ज करता येणार आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.ई., बी.टेक. किंवा बी.एस्सी (इंजिनियरिंग) पदवी मिळवलेले उमेदवार अर्जासाठी पात्र ठरतील. सामान्य आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांचे वय 1 सप्टेंबर 2025 रोजी 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे. मात्र अनुसूचित जाती-जमाती, अपंग आणि इतर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय नियमानुसार वयोमर्यादेत सूट मिळणार आहे.
या पदांसाठी नियुक्ती बेंगळुरू तसेच भारतभरातील वेगवेगळ्या शाखांमध्ये केली जाईल. उमेदवारांना प्रारंभी 2 वर्षांचा करार देण्यात येईल. त्यानंतर कामगिरीच्या आधारे करार आणखी 1 वर्षासाठी वाढवला जाऊ शकतो. पगार पहिल्या वर्षी ₹30,000 इतका असेल. दुसऱ्या वर्षी पगार ₹35,000 तर तिसऱ्या वर्षी ₹40,000 इतका मिळणार आहे.
निवड प्रक्रियेत लिखित परीक्षेसोबतच वॉक-इन मुलाखतीचाही समावेश आहे. या मुलाखतींचे आयोजन 25 आणि 26 ऑक्टोबर 2025 रोजी बेंगळुरूमध्ये केले जाणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अर्ज करताना नोकरी कोड योग्य प्रकारे भरावा.
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. उमेदवारांनी https://jobapply.in/BEL2025BNGComplex/ या लिंकवर जाऊन अर्ज करावा. नवीन उमेदवारांनी सर्वप्रथम लॉगिन तयार करून अर्ज फॉर्म भरावा. आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करावी. लागू असल्यास सामान्य/ईडब्ल्यूएस/ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ₹177/- अर्ज शुल्क भरावे लागेल. अनुसूचित जाती-जमाती, अपंग आणि इतर आरक्षित उमेदवारांना शुल्कातून सवलत दिली आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी BEL च्या अधिकृत वेबसाइट bel-india.in ला भेट द्यावी.