फोटो सौजन्य- सोशल मीडिया
CBSE Administrative Change:आपल्या देशातील सीबीएससी (CBSE) बोर्डद्वारे प्रशासकीय फेरबदल केले आहेत. केंद्र सरकारने मंडळाचे अध्यक्ष राहुल सिंह आणि सचिव हिमांशु गुप्ता याची बदली केली आहे. त्याच्या जागेवर प्रशांत सिताराम लोखंडे यांना नव्या अध्यक्षपदाची धुरा संभाळण्याची जबाबदारी दिली आहे. तसेच शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाचे संचालक वरुण भारद्वाज यांना आता अतिरिक्त सचिवाची जबाबदारी दिली आहे. हा निर्णय CBSEच्या डिजिटल मुल्यांकन प्रणाली, ऑनस्क्रीन मार्किंग(OSM) आणि पुनर्मुल्यांकन प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित होत असताना घेतल्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये हा मोठा चर्चेचा विषय बनला आहे.
केंद्र सरकारने राहुल सिंह यांच्या जागेवर प्रशांत सीताराम लोखंडे यांना CBSE च्या नव्या चेअरमनपदी नियुक्ती दिली आहे. ते आता बोर्डाच्या परीक्षा प्रणाली, मुल्यांकन प्रणाली आणि भविष्यातील शैक्षणिक ध्येयधोरणाची जबाबदारी सांभाळतील. तर दुसरीकडे, हिंमाशु गुप्ता यांच्या ठिकाणी वरूण भारद्वाज यांना सचिव पदाची जबाबदारी दिली असून त्यांची नियुक्ती केंद्रीय स्टांफिग योजनेअंतर्गत झाली आहे. वरुण भारद्वाज सप्टेंबर 2027 पर्यंत पदभार स्वीकारतील. आता CBSE समोर नव्या नेतृत्वांचा विद्यार्थ्यांवर विश्वास टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे.
सध्या सीबीएसईची (CBSE) ऑन-स्क्रीन मार्किंग(OSM) प्रणाली वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अनेक विदयार्थ्यांनी आरोप लावला आहे की, री-इवैल्यूएशन प्रक्रियेदरम्यान त्यांना जी उत्तरपत्रिका दाखवली गेली होती, त्यामध्ये त्यांचे हस्ताक्षर नव्हते. काही विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका धुसर दिसल्याचे तर काहींना तंत्रिक समस्यांना सामोरे जावे लागल्याचे सांगितले. ज्यामुळे डिजिटल मुल्यांकनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. यामुळे पालक आणि शिक्षण तज्ञांनी संपूर्ण घटनेची तपासणी करण्यास सांगितले आहे.
या वादादरम्यान CBSE ने 2 जून 2026 ला री-इव्हॅल्युएशन पोर्टल सुरु केले आहे. बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, पोर्टल सुरु झाल्यानंतर दोन मिनिटातच सायबर हल्ला झाला. मात्र, या हल्लावर बोर्डाच्या तंत्रज्ञान टीमने योग्य तो निर्णय घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. परंतु, या घटनेमुळे डिजीटल सुरक्षा आणि ऑनलाईन मुल्यांकन प्रणालीच्या विश्वसनीयतेवर प्रश्न उपस्थित झाला आहे.






