फोटो सौजन्य- सोशल मीडिया
CBSE च्या ऑन स्क्रिन मार्किंग (OSM) प्रणालीमध्ये निर्माण झालेल्या वादामुळे सरकारने या प्रकरणाची तपासणी सुरू केली आहे. या तपास यंत्रणेची मुख्य जबाबदारी माजी IAS अधिकारी एस. राधा चव्हाण यांच्यावर सोपवली आहे. शिक्षण आणि प्रशासनातील प्रदीर्घ अनुभवामुळे केंद्र सरकारने त्यांच्यावर हा विश्वास दाखवला आहे.
कोण आहेत एस राधा चव्हाण
एस. राधा चव्हाण या उत्तर प्रदेश कॅडर 1988 बॅचमधील IAS अधिकारी आहेत. त्यांनी दिल्ली विश्वविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेतले आहे. गेल्या 36 वर्षापासून विविध प्रशासकीय विभागाची जबाबदारी त्यांनी सांभाळली असून सध्या त्या क्षमता निर्माण आयोगाच्या(Capacity Building Commission) अध्यक्ष आहेत.
त्यांनी त्यांच्या कार्यकाळात शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, महिला आणि बाल विकास, शहरी विकास आणि कौशल्य विकासाच्या क्षेत्रात काम केले आहे. सरकारी योजना प्रभावीपणे लागू करण्यात आणि प्रशासकिय क्षेत्रातल्या सुधारणांमध्ये त्यांचा हातखंड आहे.
CBSE Administrative Change: सीबीएसईमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल; अध्यक्ष आणि सचिवांची तडकाफडकी बदली!
सध्या अनेक विद्यार्थी आणि पालकांनी CBSE च्या ऑन-स्क्रिन मार्किंग प्रणालीशी संबंधित प्रश्न उपस्थित केले आहेत. काही लोकांचे म्ह्णणे आहे की, या मुल्यांकन प्रणालीमुळे विद्यार्थ्यांच्या गुणांवर मोठा परिणाम झाला आहे. यानंतर ही घटना चर्चेचा विषय बनली असून त्याच्या तपासणीची मागणी जोर धरत आहे.
या प्रकरणाचा वाद अधिक वाढल्यामुळे तात्कालीन अध्यक्ष राहुल सिंह आणि सचिव हिमांशु गुप्ता यांची बदली केली आहे. यानंतर राधा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण प्रकरणाची तपासणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
सीबीएसची (CBSE) ही समिती ऑन स्क्रिन मार्किंग सिस्टिमची संपूर्ण प्रक्रिया समजून घेऊन मुल्यांकन प्रणालीतील त्रुटी शोधण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर या विद्यार्थ्यांच्या तक्रारीत किती सत्यता आहे, याची पडताळणी केली जाईल. तसेच भविष्यात अशी परिस्थिती नंतर उदभवणार नाही, याची काळजी घेतली जाईल.






