फोटो सौजन्य - Social Media
रेल्वे मंत्रालयात काम करू पाहणाऱ्या उमेदवरांसाठी आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही भारतीय रेल्वेत काम करण्याची उच्च बाळगून आहात तर नक्कीच या भरतीचा आढावा घेण्यात यावा. इच्छुक असल्यास आजच या भरतीसाठी अर्ज करा. या भरतीबाबत सगळ्यात महत्वाची बातमी म्हणजे उमेदवारांना उच्चशिक्षित असणे गरजेचे नाही. अगदी दहावी पास उमेदवारांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. रेल्वे व्हीकल फॅक्टरी (RWF) मध्ये विविध पदांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण १९२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. फिटरच्या पदासाठी ८५ जागा रिक्त आहेत. मशीनिस्टच्या पदांसाठी ३१ जागा रिक्त आहेत.
मॅकेनिक मोटार वाहनच्या पदांसाठी एकूण ८ जागा रिक्त आहेत तर टर्नरच्या पदांसाठी ५ जागा रिक्त आहेत. इलेक्ट्रिशियनच्या पदांसाठी १८ जागा रिक्त आहेत. इलेक्ट्रॉनिक मॅकेनिकच्या पदासाठी २२ जागा रिक्त आहेत तर सीएनसी प्रोग्रामिंग कम ऑपरेटर सीओई ग्रुच्या पदांसाठी एकूण २३ जागा रिक्त आहेत. अशा एकूण १९२ रिक्त जागांसाठी उमेदवारांना नियुक्त करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी लेख संपूर्ण वाचा.
या भरतीसाठी उमेदवारांना काही पात्रता निकष पात्र करावे लागणार आहेत. हे निकष शैक्षणिक आहेत. जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद आहेत. त्यानुसार, अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेतून किमान दहावी उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवाराकडे संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. वयोमर्यादा पाहिली तर, किमान १८ वर्षे आयु असणाराने उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तसेच जातीत जास्त आयु २४ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
सीएनसी प्रोग्रामिंग कम ऑपरेटरच्या पदासाठी 10,899 रुपये वेतन निश्चित करण्यात आली आहे. तर इतर पदी निवड होणाऱ्या उमेदवारांना दरमाह 12,261 रुपये वेतन देण्यात येणार आहे. या भरतीमध्ये नियुक्ती दहावीच्या गुणांवर देण्यात येणार आहे. तसेच उमेदवारांना अर्ज करताना काही रक्कम अर्ज शुल्क म्हणून भरावी लागणार आहे. सामान्य प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून १०० रुपये भरावे लागणार आहे. तर OBC उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणूनदेखील सारखीच रक्कम भरावी लागणार आहे. SC/ ST/ तसेच इतर सर्व श्रेणीतील महिला उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे.