राज्यात पावसाने थैमान घातलं आहे. मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले पाहायला मिळाल. अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले होते त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचणे अशक्य होत. गेल्या आठ दिवसापासून पाऊस धो धो कोसळतय त्यामुळे घरातून बाहेर पडणे अशक्य होत आहे. राज्यात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या फेरीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली होती. मात्र अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी महाविद्यालय जाणे शक्य नव्हत त्याची मुदत संपत आली होती. २५ ते २९ सप्टेंबर दरम्यान प्रवेश घ्यायचा होता मात्र विद्यार्थ्यांना शक्य नव्हत म्हणून आता मुदत वाढ देण्यात आली आहे.
पाचवी फेल पण घडवू शकतो इतिहास! वडिलांनी दिला उपदेश, आज आहे IAS
कोणत्या विध्यार्थ्यांना फायदा
राज्यातील सीईटी सेलने मुदतवाढ दिली आहे. राज्यातील जवळपास २ हजार विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. सीईटी सेलने राज्यातील एमबीबीएस आणि दंत वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २४ तारखेला यादी जाहीर केली होती. चार दिवसात प्रवेश घेणे आवश्यक होत. मात्र आता प्रवेशाला मुदतवाढ देण्यात आली आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे.
दुसऱ्या फेरीत किती जागा शिल्लक
राज्यात पहिल्या फेरीत एमबीबीएस आणि दंत वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये १० हजार ८६४ जागा होत्या. त्यापैकी ७ हजार ८०९ जागांवर प्रवेश पार पडले आहेत. दुसऱ्या फेरीत ३ हजार ५५ जागा शिल्लक आहेत. त्याच्या प्रवेशाला आता मुदत वाढ देण्यात आली आहे.
आता शेवटची तारीख काय?
२४ ते २९ सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती. ती वाढवून आता २ ऑक्टोबर पर्यंत करण्यात आली आहे. संध्याकाळी ५.३० वाजे पर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेता येणार आहे. राज्यात पूरस्थितीमुळे निर्माण झालेल्या अडचणीचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागला मात्र शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सीईटी सेलने निर्णय घेतला आहे.
GATE 2026 परीक्षेची अधिकृत अधिसूचना जाहीर! ‘या’ तारखेला होणार परीक्षा
IIT गुवाहाटीने GATE 2026 परीक्षेची अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर आयोजित होणार असून ७, ८, १४ आणि १५ फेब्रुवारी २०२६ रोजी विविध शहरांमध्ये होईल. GATE ही परीक्षा M.Tech आणि Ph.D. प्रवेशासाठी तसेच ONGC, NTPC, IOCL, BHEL, DRDO यांसारख्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये भरतीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. यंदा ३० पेपर घेण्यात येणार आहेत, त्यात Engineering Sciences अंतर्गत “Energy Science (XE-I)” हा नवीन विषयही समाविष्ट केला आहे.
IIT पदवीधर झाला IPS ! ३५ लाखांच्या नोकरीला सोडून देशसेवेसाठी पात्र केली स्पर्धा परीक्षा