Friendship Day 2026: मैत्रीच्या नात्याला द्या प्रेमाची ऊब! फ्रेंडशिप डे निमित्त मित्रमैत्रिणींना द्या मराठमोळ्या शुभेच्छा
श्रीकृष्ण आणि सुदामाची मैत्री आजही अजरामर आहे. कारण मैत्रीचा धागा खूप अनमोल असतो. रक्ताच्या नात्यानंतर मैत्रीचे नाते सगळ्यात श्रेष्ठ मानले जाते. दरवर्षीं भारतात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी २ ऑगस्ट फ्रेंडशिप डे साजरा केला जाणार आहे. आयुष्यात भेटलेले खरे आणि जिवलग मित्रमैत्रणीनी कठीण काळात कायमच सोबत असतात. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मित्र अनमोल साथ देते. यंदाच्या वर्षी फ्रेंडशिप डे चा उद्देश मैत्री, विश्वास आणि परस्पर आदराला प्रोत्साहन देणे हा आहे. सुख-दुःखात आपल्या पाठीशी उभ्या राहिलेल्यांचे आभार मानण्याची ही आपल्याला एक संधी देते. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील मित्रमैत्रिणींना दिर्घायुष्यासाठी या मराठमोळ्या शुभेच्छा नक्की द्या. यामुळे नात्यांमधील प्रेम आणि गोडवा टिकून राहील.(फोटो सौजन्य – istock)
खरे मित्र कधीच दूर जात नाहीत,
जरी ते रोज बोलत नसले तरी
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मैत्री आपली मनात जपली
कधी सावलित विसावली
कधी उन्हात तापली
मैत्री आपली कधी फुलात बहरली
कधी काट्यात रुतली मैत्री आपली !!
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
हजार मित्र असण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा,
जो हजार जण तुमच्या विरुद्ध असताना
तुमच्या सोबत असेल
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
काही शब्द नकळत कानावर पडतात
कोणी दूर असुनही उगाच जवळ
वाटतात खर तर ही मैत्रीची नाती
अशीच असतात आयुष्यात येतात
आणि आयुष्यच बनून जातात.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते,
आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते,
दुःख दाखवायला आसवांची गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,
ती म्हणजे मैत्री असते.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
लोक रूप पाहतात, आम्ही हृदय पाहतो
लोक स्वप्न पाहतात, आम्ही सत्य पाहतो
फरक एवढाच आहे की लोक जगात
मित्र पाहतात पण आम्ही
मित्रामध्ये जग पाहतो.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
शब्दा पेक्षा सोबतीच
सामर्थ्य जास्त असते,
म्हणून मैत्रीचे खरे समाधान
खांद्यावरच्या हातात असते.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
अनोळखी अनोळखी म्हणत असताना
अचानक एकमेकांची सवय होऊन जाणं
म्हणजे “मैत्री”
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आयुष्याच्या कोणत्याही
वळणावर माणूस कधीच
एकटा पडू नये म्हणून…
देवानं “मैत्रीचं” नातं निर्माण केलं..
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Friendship Day Prediction: फ्रेंडशिप डेच्या दिवशी 8 राशीच्या लोकांचा दिवस राहील उत्तम
काही शब्द नकळत कानावर पडतात
कोणी दूर असुनही उगाच जवळ
वाटतात खर तर ही मैञीची नाती
अशीच असतात आयुष्यात येतात
आणि आयुष्यच बनून जातात.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
शाळेतील लाजिरवाण्या टोपणनावांपासून ते मोठेपणीच्या संकटापर्यंत – माझ्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद..
पंखांशिवाय उडण्याचे स्वप्न असते, मैत्रीचे जग देखील अद्भुत असते. आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाच्या शुभेच्छा मित्रा!
लोक चेहरा पाहतात, आपण हृदय पाहतो. लोक स्वप्ने पाहतात, आपण वास्तव पाहतो. लोक जगात मित्र पाहतात, आपण मित्रांमध्ये जग पाहतो.






