फोटो सौजन्य- सोशल मीडिया
How to Get Job in Microsoft: आजच्या काळात टेक कंपन्यामध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न तरूण सर्वात जास्त पाहतात. विशेष म्हणजे यांच्यामध्ये ‘मायक्रोसॉफ्ट’चे (Microsoft) चे नाव सर्वात वर येते. जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्याच्या यादीत वरच्या स्थानावर येणाऱ्या टेक कंपन्यांमध्ये विशेषत: मायक्रोसॉफ्टमध्ये काम करण्याचे विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. आकर्षक पगार, उत्तम वर्क कल्चर आणि नवीन तंत्रज्ञानावर काम करण्याची संधी तरूणांना या कंपनीकडे आकर्षित करते. परंतु, प्रश्न असा आहे की, मायक्रोसॉफ्ट कंपनीत नोकरी कशी मिळते. चला तर मग जाणून घेऊया मायक्रोसॉफ्टपर्यंत पोहचण्याचा संपूर्ण मार्ग..
मायक्रोसॉफ्टमधील बहुतांश तांत्रिक पदांसाठी कॉम्प्युटर सायन्स(Computer Science), आयटी (IT), सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगशी (Software Engineering) शी संबंधित शिक्षणाला प्राधान्य दिले जाते. तसेच B.Tech, B.E., BCA, MCA लासुद्धा जास्त संधी दिली जाते. तसेच येथे फक्त पदवी शिक्षणावर निवड आधारित नसून, त्याच्या कोडिंग आणि तंत्रज्ञानावर आधारित कौशल्याला महत्त्व दिले जाते.
Govt Jobs After 12th: पदवीशिवाय सरकारी नोकरी कशी मिळवायची? ‘हे’ आहेत सर्वोत्तम मार्ग
तज्ञांच्या मते, मायक्रोसॉफ्टच्या मुलाखतीमध्ये Data Structures and Algorithms (DSA) हा महत्त्वाचा भाग असतो, तसेच येथे Array, Graph, Queue यांसारख्या टॉपिकवर आणि C++, Java, Python, JavaScript यांसारख्या प्रोग्रामिंग भाषांवर प्रभुत्व असणेही गरजेचे आहे. कारण या भाषा कंपन्यांच्या तांत्रिक कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातात.
अलीकडच्या काळात मायक्रोसॉफ्ट आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स(AI) आणि मशीन लर्निंग(ML) वर खूप मोठ्या प्रमाणावर काम करत आहे. अशा परिस्थितीत Python आणि SQL सारखी टूल्स शिकणे अत्यंत आवश्यक मानले जाते. तसेच येथे मुलाखत देणाऱ्या उमेद्वाराकडे Azure Cloud शी संबंधीत कोर्सचे सर्टिफिकेट असेल तर त्याची नोकरी मिळवण्याची शक्यता अधिक वाढते.
कॅम्पस प्लेसमेंट: IIT, NIT आणि देशातील मोठ्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये मायक्रोसॉफ्ट थेट कॅम्पस भरतीसाठी जाते.
इंटर्नशिप (Internship): विद्यार्थी ‘Microsoft Internship’ च्या माध्यमातून कंपनीशी जोडू शकतात. इंटर्नशिपदरम्यान चांगली कामगिरी केल्यास मायक्रोसॉफ्टमध्ये थेट नोकरीची संधी मिळू शकते.
ऑफ कॅम्पस (Off-Campus / Direct Apply): उमेद्वार कंपनीच्या अधिकृत करिअर पोर्टलवर जाऊन थेट रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतो.






