फोटो सौजन्य: @VaibhavSV12 (X.com)
काल म्हणजेच 29 एप्रिल 2025 रोजी RR vs GT हा सामना झाला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा एकतर्फी विजय झाला. आणि या विजयाचे कारण वैभव सूर्यवंशी. या अवघ्या 14 वर्षाच्या पोराने भल्याभल्या बॉलर्सना घाम फोडला. फक्त 38 चेंडूत शतक ठोकत वैभव सूर्यवंशी याने राजस्थान रॉयल्स IPL मध्ये जीवित ठेवले आहे. या मॅचनंतर सगळीकडेच वैभव सूर्यवंशीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पण वैभवने क्रिकेटचे प्रशिक्षण कुठे घेतले हे तुम्हाला ठाऊक आहे का? चला याबद्दल जाणून घेऊयात.
प्रोजेक्ट्स लिमिटेडमध्ये मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर पदांसाठी भरती सुरू, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
वैभव सूर्यवंशी यांनी क्रिकेट अकादमी समस्तीपूरमधून आपल्या क्रिकेटच्या करिअरची सुरुवात केली. जिथे ब्रजेश झा यांनी वैभव सूर्यवंशीवर खूप मेहनत घेतली. याच ठिकाणी त्याने स्ट्रेट ड्राइव्ह मारणे आणि मैदानावर टिकून राहणे शिकले. या अकादमीमध्ये त्याला एक उत्कृष्ट कोचिंग स्टाफ मिळाला, ज्यांनी सुरुवातीपासूनच त्याचे टेक्निक्स सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले.
यानंतर, वैभव सूर्यवंशीच्या उत्तम परफॉर्मन्ससाठी पटना येथील मनीष ओझा यांच्याकडे पाठवण्यात आले. जिथे इतर त्याच्यातील परफॉर्मन्समध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या. या काळात, वैभवच्या वडिलांनी आपल्या मुलाला पाटण्याला घेऊन जाण्यासाठी गाडी घेतली होती. रिपोर्ट्सनुसार, वैभव एका दिवसात मनीष ओझाला भेटायला जायचा आणि क्रिकेट टिप्स घ्यायचा.
ISRO मध्ये भरतीला सुरुवात; त्वरित करा अर्ज, ‘या’ तारखेपर्यंत Application Window खुली
आज वैभव सूर्यवंशी जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगपैकी एक असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये आपला ठसा उमटवला आहे. हाय स्ट्राईक रेटसह लांब षटकार मारण्याची त्याची क्षमता पाहून, 14 वर्षांचा मुलगा इतका चांगला कसा खेळू शकतो याचे सर्वांनाच आश्चर्य वाटते. द वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड देखील वैभवच्या फलंदाजीने इम्प्रेस झाले आहे.
आज ज्या ठिकाणी वैभव सूर्यवंशी आहे त्यात त्याच्या वडिलांची महत्त्वाची भूमिका आहे. संजीव सूर्यवंशी यांनी त्यांच्या मुलाच्या करिअरमध्ये मोठे योगदान दिले आहे. त्यांनी वैभवला खूप पाठिंबा दिला. एवढेच नव्हे तर आपल्या मुलाच्या स्वप्नांसाठी त्यांनी त्याचे शेतही विकले.