फोटो सौजन्य- सोशल मीडिया
IUAC government jobs: जर तुम्ही सरकारी नोकरीचे स्वप्न पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत आणि विद्यापीठ अनुदान आयोगाची (UGC) स्वायत्त संस्था असलेल्या ‘इंटर-युनिव्हर्सिटी एक्सिलेरेटर सेंटर’ (IUAC), नवी दिल्ली येथे विविध पदांवर भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून एकूण ८ रिक्त पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ४ ऑगस्ट २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.
वैज्ञानिक-सी (Scientist-C): ५ पदे
ज्युनियर इंजिनीअर-सी (Junior Engineer-C): २ पदे
लायब्ररी असिस्टंट-सी (Library Assistant-C): १ पद
वैज्ञानिक-सी: उमेदवाराकडे फिजिक्स (भौतिकशास्त्र) किंवा अप्लाइड फिजिक्समध्ये एमएससी (M.Sc) ची पदवी असणे आवश्यक आहे. तसेच, इयत्ता १० वी पासून ते उच्च शिक्षणापर्यंत प्रत्येक परीक्षेत किमान ६० टक्के गुण असणे अनिवार्य आहे. या पदासाठी कमाल वयोमर्यादा २६ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
ज्युनियर इंजिनीअर-सी: या पदासाठी इलेक्ट्रॉनिक्समधील डिप्लोमा अनिवार्य आहे. उमेदवाराला १० वी मध्ये किमान ६० टक्के गुण असणे आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रातील अनुभव आणि संगणकाचे ज्ञान असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. कमाल वयोमर्यादा ३० वर्षे आहे.
लायब्ररी असिस्टंट-सी: या पदासाठी बीएससी (B.Sc) सोबतच बी.लिब. (B.Lib) ची पदवी आणि संगणकीकृत ग्रंथालयामध्ये (Computerized Library) किमान चार वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. या पदासाठी कमाल वयोमर्यादा ३४ वर्षे ठेवण्यात आली आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) आकर्षक वेतन श्रेणी मिळणार आहे:
वैज्ञानिक-सी: पे-लेव्हल १० नुसार प्रतिमहिना ५६,१०० ते १,७७,५००
ज्युनियर इंजिनीअर-सी: पे-लेव्हल ६ नुसार प्रतिमहिना ३५,४०० ते १,१२,४००
लायब्ररी असिस्टंट-सी: पे-लेव्हल ६ नुसार प्रतिमहिना ३५,४०० ते १,१२,४००
Cheapest IIM in India: एमबीए करायचयं! मग ‘या’ सर्वात स्वस्त आयआयएम संस्थांबद्दल नक्की जाणून घ्या
वैज्ञानिक-सी: या पदासाठी प्रथम लेखी परीक्षा होईल आणि त्यानंतर मुलाखत घेतली जाईल.
ज्युनियर इंजिनीअर-सी आणि लायब्ररी असिस्टंट-सी: या पदांसाठी लेखी परीक्षेनंतर स्किल टेस्ट किंवा ट्रेड टेस्ट घेतली जाईल.
अंतिम गुणवत्ता यादी उमेदवाराच्या कामगिरीच्या आधारे तयार केली जाईल.
इच्छुक उमेदवार IUAC च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्जासाठी प्रथम नोंदणी (Registration) करावी लागेल, त्यानंतर अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल. यानंतर आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी (Signature) अपलोड करून अर्ज सबमिट करावा लागेल. एखाद्या पदासाठी अर्ज शुल्क लागू असल्यास, त्याचे पेमेंट देखील ऑनलाईन करावे लागेल.






