फोटो सौजन्य - Social Media
रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने भरतीला सुरुवात केली होती. आज या भरतीमध्ये भरण्यात आलेल्या फॉर्ममध्ये दुरुस्ती करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांना ३२,४३८ इतक्या रिक्त जागांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. या भरतीसंदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. या अधिसूचनेत नमूद असलेल्या माहितीप्रमाणे दरमाह वेतन १८,००० रुपये देण्यात येणार आहे. २३ जानेवारी २०२५ रोजी या भरतीसाठी अर्ज करण्यास उमेदवारांनी सुरुवात केली होती. उमेदवारांना १ मार्च २०२५ पर्यंत या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या भरतीमध्ये अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरायचे होते. अर्ज शुल्क ऑनलाईन भरायचे होते. ३ मार्च २०२५ पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. ४ मार्च ते १३ मार्च दरम्यान उमेदवारांना अर्जाच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी असतील तर त्या सुधारता येणार आहे. परीक्षेची तारीख अद्याप आयोजित नाही आहे. ती लवकरच कळवण्यात येणार आहे.
उमेदवारांना अर्ज करताना अर्ज शुल्क भरायचे होते. सामान्य प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ५०० रुपये निश्चित केले आले होते. तर OBC आणि EWS प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्कदेखील ५०० रुपये निश्चित करण्यात आले होते. ST तसेच ST प्रवर्गातील उमेदवारांना २५० रुपये तर PWD/ ESM/ Female उमेदवारांनादेखील २५० रुपये निश्चित करण्यात आले होते. अर्ज ऑनलाईन स्वरूपात भरायचे आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना काही पात्रता निकषांना पात्र असणे अनिवार्य होते. हे निकष शैक्षणिक आहेत तर उमेदवारांच्या वयोमर्यादे संदर्भात आहेत. किमान १८ वर्षे आयु असणारे उमेदवार तर जास्तीत जास्त ३६ वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. १०वी पास असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकत होते.
एकूण ४ टप्प्यांमध्ये ही भरती आयोजित करण्यात आली आहे. उमेदवारांना लेखी परीक्षा पात्र करावी लागणार आहे. दुसऱ्या टप्प्यात Physical Efficiency Test पात्र करावे लागणार आहे. दस्तऐवजांची पडताळणी तसेच वैद्यकीय चाचणीसह उमेदवारांना या संपूर्ण भरतीला पात्र करता येणार आहे. पात्र उमदेवरांना नियुक्ती प्राप्त करता येणार आहे.