रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Russian Oil : भारत रशिया मैत्रीत मिठाचा खडा? सवलत बंद करुन रशियाने वाढवले तेलाचे भाव
एका विशेष मुलाखतीदरम्यान सर्गेई लाव्हरोव यांनी पाश्चात्य देशांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, अमेरिका (America) आणि त्याचे मित्र राष्ट्र अजूनही जुन्या वसाहतवादी मानसिकतेत आहेत. दुसऱ्या देशांवर स्वत:च्या अटी लादणे आणि त्यांच्या उर्जा गरजांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करणे ही लोकशाही नसल्याचे लावरोव यांनी म्हटले.
ते पुढे असेही म्हणाले की, अमेरिका भारतासारख्या देशांना रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करणे बंद करण्यास सांगून स्वत: महागडे तेल विकण्याचा प्रयत्न करत आहे. हा एक प्रकारे अनुचित व्यापार खेळ असल्याचा आरोप लावरोव यांनी केला आहे.
गेल्या दोन वर्षात भारताने रशियाकडून कच्चा तेलाची आयात मोठ्या प्रमाणावर केली आहे. पाश्चात्य देशांच्या निर्बंधाची भीती न बाळगता राष्ट्रीय हिताला भारताने प्राधान्य दिले आहे. लावरोव यांनी भारताच्या या भूमिकेचे कौतुक केले आहे. भारत नेहमीच आपल्या बाजारपेठेच्या गरजा आणि जनतेचे हित पाहून निर्णय घेतो, कोणच्या दबावाला बळी पडत नाही असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. यावरुन भारत आणि रशियाचे संबंध (India Russia Relations) किती दृढ आहे.
ऑक्टोबर २०२५ मध्ये अमेरिकेने रोसनेफ्ट आणि लुकोइल सारख्या रशियन कंपन्यांवर निर्बंध लादले होते. यामुळे आयातीत मोठ्या प्रमाणात रखडली होती. तसेच पश्चिम आशियातील तणावामुळे जागतिक उर्जा बाजारातही मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. अमेरिकेने काही निर्बंधात १६ मे पर्यंत सुट दिली आहे, यामुळे भारताला काही दिलासा मिळाला आहे. यामुळे रशियाकडून सवलतीच्या दरात तेल आयात करणे सोपे होईल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
Ans: रशियाचे परराष्ट्र मंत्री यांनी अमेरिका आणि पाश्चात्य देशांच्या भूमिकेला जुन्या वसाहतीवादी मानसिकतेचे मानले आहे. त्यांच्या मते हे देश दुसऱ्या देशांवर आपल्या अटी लाहण्याचा आणि जागतिक उर्जा बाजारावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. भारताला रशियन तेल स्वस्त दरात मिळण्यापासून रोखण्याचा डाव आहे.
Ans: भारताने नेहमीच स्पष्ट केले आहे की, तेल खरेदीचा निर्णय हा राष्ट्रीय हितानुसार आणि बाजारपेठेच्या गरजेनुसार खरेदी करतो. यामुळे कोणत्या देशाकडून तेल खरेदी करायचे याचा निर्णय भारत स्वत: घेतो, कोणाच्या दबावाखाली नाही.






