बाप रे! महाभंयकर पुरात वाहून आले हजारो सिलेंडर; फुकटच्या टाक्या पळवण्यासाठी लोकांनी काय केलं पाहा, VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सिलेंडर वाहून जात असल्याची माहिती कळताच लोक नदीकाठी जमा झाले होते. गॅस महाग झाल्यामुळे फुकट सिलेंडर मिळवण्यासाठी गावातील काही तरुणांनी आपला जीव धोक्यात घातला आणि थेट पुराच्या पाण्यात उडी मारली. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, काही लोक नदीचा प्रवाह वेगावना असतानाही पाण्यात उतरले असून सिलेंडर पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. काहींनी सिलेंडर बाहेर काढण्यासाठीि छोट्या छोट्या होड्या आणि बोटी पाण्यात उतरवल्या आहेत. नदीतून सिलेंडर बाहेर काढून घेऊन जातानाचे दृश्य दिसत आहे. सिलेंडरचा खच पाहायला मिळत आहे. पुलावर शेकडो लोक उभे राहून याचा व्हिडिओही बनवत आहेत. सध्या या पराक्रमाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
आपदा में अवसर ढूंढना कोई हमसे सीखे 😯 हमारे देश में भी सब अजीब लोग हैं बारिश की बजह से HP का Cylinder पानी के साथ बह जा रहा है 😱 लेकिन लोग अपना अपना काम कर रहे हैं इतना तेज पानी में सिलेंडर को लेने के लिए पानी में उतरकर बाहुबली बन रहे हैं 😃☹️ pic.twitter.com/BKr5Mknjor — Subhajit Das (@SantaniSubhajit) July 9, 2026
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @SantaniSubhajit या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडिओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहे. अनेकांनी यावर कमेंट्सचा पूर आणला आहे. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, भारतात नागरिकच फुकटावर टपून बसले आहे, मग सरकार यांची लूट का करणार नाही असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकान याची तुलना पुष्पा चित्रपटातील चंदन वाहून नेण्याच्या सीनशी केली आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






