फोटो सौजन्य- सोशल मीडिया
NMC Big Decision:नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा आणि शिक्षण पद्धतीत एक मोठा बदल केला आहे. या नव्या बदलानुसार, आता एमबीबीएस पूर्ण करण्यासाठी कमाल वयोमर्यादा ९ वर्षावरून वाढवून १० वर्ष करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अंडरग्रेज्युएट वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठी एक अतिरिक्त वर्ष मिळणार आहे. हा प्रस्ताव ग्रेज्युएट मेडिकल एज्युकेशन रेग्युलेशन्समधील दुरुस्ती अंतर्गत करण्यात आला आहे.
आता कोणत्याही विद्यार्थ्यांला एमबीबीएस (MBBS) प्रोग्राम सुरू केल्यापासून कमाल १० वर्षांच्या आत हा कोर्स आणि अनिवार्य रोटेटरी इंटर्नशिप (Rotatory Internship) पूर्ण करावी लागेल, पूर्वी जी मर्यादा ९ वर्ष होती. मात्र, ‘फर्स्ट प्रोफेशनल एमबीबीएस’ (First Professional MBBS) उत्तीर्ण करण्यासाठी कमाल प्रयत्नांची (Attempts) मर्यादा ही ४ वर्षेच राहणार आहे. ज्यामुळे विद्यार्थी आपले शिक्षण एका निश्चित वेळेत पूर्ण करू शकतील.
RRB Result: टेक्निशियन ग्रेड ३ परीक्षेचा निकाल जाहीर; गुणवत्ता यादी आणि कटऑफ ‘असा’ करा चेक!
या नव्या प्रस्तावाचा फायदा अशा विद्यार्थ्यांना होणार आहे, ज्यांचे वैद्यकीय शिक्षण काही आर्थिक किंवा वैयक्तिक कारणास्तव थांबते. भारतात अनेकदा विद्यार्थ्यांना अनपेक्षित अडचणींमुळे आपले शिक्षण मध्येच थांबवावे लागते, अशा परिस्थितीत पूर्वीची ९ वर्षांची मर्यादा विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये अडथळा ठरत होती. परंतु, आता १० वर्षांच्या मर्यादेमुळे विद्यार्थ्यांना थोडी लवचिकता (Flexibility) मिळेल. ज्यामुळे ते मानसिक दडपणाशिवाय आपले शिक्षण पूर्ण करू शकतील. वैद्यकीय प्रणाली अधिक विद्यार्थी हितैषी (Student-Friendly) बनवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
एनएमसीने (NMC) या सुधारित मसुद्याला ‘गझट ऑफ इंडिया’मध्ये प्रसिद्ध करून सर्व संबंधित घटकांसाठी(Stakeholders) खुले केले आहे, जेणेकरून ते आपल्या प्रतिक्रिया देऊ शकतील. यामध्ये मेडिकल कॉलेजेस, प्राध्यापक (फॅकल्टी सदस्य), विद्यार्थी आणि इतर संबंधित व्यक्तींचा समावेश आहे. सरकारने यावर ३० दिवसांच्या आत सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. या सर्व सूचनांवर विचार केल्यानंतर अंतिम नियमांची अंमलबजावणी केली जाईल.






