फोटो सौजन्य- सोशल मीडिया
ज्या उमेदवारांनी ६, ९ आणि १० मार्च २०२६ रोजी आयोजित केलेल्या कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) म्हणजेच संगणक आधारित परिक्षेत भाग घेतला होता. ते आता आपल्या संबंधित आरआरबी झोनच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन निकाल पाहू शकतात. बोर्डाने गुणवत्ता यादी (Merit List), झोननुसार कटऑफ आणि स्कोरकार्ड देखील प्रसिद्ध केले आहे.
उमेद्वारांनी निकाल पाहण्यासाठी उमेद्वारांनी आरआरबीच्या झोनच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन “Technician Grade III Result 2026” या लिंकवर क्लिक करावे. यानंतर गुणवत्ता यादीची पीडीएफ PDF डाऊनलोड करून ‘Ctrl+F’ च्या मदतीने आपला रोल नंबर शोधू शकता. ज्या उमेद्वारांचा रोल नंबर गुणवत्ता यादीत समाविष्ट आहे, त्यांना पुढील टप्प्यासाठी कागदपत्र पडताळणीसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल.
संबंधित उमेद्वाराने त्याचे नाव, नोंदणी क्रमांक, नॉर्मलाईज्ड स्कोर, क्वालिफाइंग स्टेटस आणि कागदपत्र पडताळणीसाठीची पात्रता यांसारखी महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. उमेद्वारांनी हा तपशील काळजीपूर्वक तपासावा.
आरआरबीने स्पष्ट केले आहे की, कागदपत्र पडताळणीसाठी निवड झालेल्या उमेद्वारांना निश्चत केलेल्या केंद्रावर आपल्या सर्व मूळ कागदपत्रांसह(Original Documents) उपस्थित राहावे लागेल. याशिवाय उमेद्वारांना अधिकृत पोर्टलवर आपल्या कागदपत्रांची स्कॅन कॉपी देखील अपलोड करावी लागेल. कागदपत्र पडताळणीनंतर उमेद्वारांची वैद्यकीय तपासणी (Medical Test) केली जाईल.






