फोटो सौजन्य - Social Media
ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ONGC) तर्फे अप्रेंटिस पदांसाठी (Career) मोठी भरती जाहीर करण्यात आली असून या भरतीअंतर्गत एकूण 2,623 पदे भरली जाणार आहेत. ही भरती देशभरातील विविध विभागांमध्ये केली जाणार असून अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी तत्काळ ओएनजीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर www.ongcindia.com भेट देऊन आपला अर्ज पूर्ण करावा. या भरतीद्वारे उत्तरी विभागात 165, पश्चिम विभागात 856, मुंबई सेक्टरमध्ये 569, पूर्व विभागात 458, दक्षिण विभागात 322 आणि केंद्रीय विभागात 253 अशा एकूण 2,623 जागा उपलब्ध आहेत.
शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रातील आवश्यक पात्रता असणे गरजेचे आहे. डिप्लोमा ट्रेडसाठी उमेदवाराकडे तीन वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा असावा, तर ग्रॅज्युएट ट्रेडसाठी संबंधित क्षेत्रातील पदवीधर उमेदवार पात्र ठरतील. वयोमर्यादा किमान 18 वर्षे आणि कमाल 24 वर्षे अशी आहे. तसेच आरक्षणानुसार SC/ST उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत 5 वर्षांची, OBC (Non-Creamy Layer) उमेदवारांना 3 वर्षांची आणि दिव्यांग उमेदवारांना 10 वर्षांपर्यंतची सवलत देण्यात येईल.
पदनिहाय मानधन (Stipend) प्रतिमहिना ₹8,200 ते ₹12,300 इतके राहील. उमेदवारांची निवड मेरिटच्या आधारे, म्हणजेच शैक्षणिक गुणांच्या आधारे केली जाईल. या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत होणार नाही. त्यामुळे पात्र उमेदवारांनी आपले गुणपत्रक आणि आवश्यक कागदपत्रांची अचूक माहिती अर्जात नमूद करणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी nats.education.gov.in किंवा www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळांवर जाऊन “Recruitment” विभागात जावे. तेथून “Apply Online” पर्याय निवडून अर्ज फॉर्म भरावा, आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करावी. सर्व माहिती योग्यरीत्या भरल्यानंतर अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट काढून ठेवावी. ही भरती सरकारी उपक्रमात काम करण्याची आणि प्रत्यक्ष अनुभवासह करिअरची मजबूत पायाभरणी करण्याची सुवर्णसंधी आहे. अभियांत्रिकी व पदवीधर उमेदवारांसाठी आकर्षक मानधनासह प्रशिक्षण घेण्याची ही उत्तम संधी गमावू नका.






