फोटो सौजन्य - सोशल मीडिया
STEM (Science, Technology, Engineering, and Mathematics) हा एक असा अभ्यासक्रम आहे. ज्यात पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिक प्रयोगावर, ज्ञानावर भर देतो. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांमध्ये हा सर्वात लोकप्रिय आहे. आधुनिक काळात संशोधन आणि तंत्रज्ञानावर आधारित क्षेत्रात करियर करण्यासाठी महत्त्वाचा आहे.
डेटा सायन्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स तसेच एआय आणि मशिन लर्निंगशी संबंधित अभ्यासक्रमाला भारतीय विद्यार्थ्यांचा अधिक कल वाढत आहे. आयटी आणि टेक क्षेत्रातील जास्त मागणीमुळे हे अभ्यासक्रम वेगाने लोकप्रिय होत आहेत. जर तुम्हाला भरगच्च पगाराची नोकरी हवी असेल तर एआय संबंधित अभ्यासक्रम निवडणे सोईस्कर राहील.
एमबीए, बिझनेस ॲनालिटिक्स, फायनान्स आणि अकाउंटिंग यांसारख्या अभ्यासक्रमांना केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही जास्त मागणी आहे. हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी सहज उपलब्ध होत आहेत.
या अभ्यासक्रमांमध्ये नर्सिंग, आरोग्य, विज्ञान आणि जैवतंत्रज्ञान यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो. आरोग्यसेवा क्षेत्राच्या वाढत्या मागणीमुळे विद्यार्थ्यांचा पसंतीक्रम या अभ्यासास वाढत आहे.
ज्या विद्यार्थ्यांना रजनात्मक, सर्जनशील क्षेत्रात करिअर करायचे आहे. ते मानसशास्त्र, माध्यम आणि संवाद किंवा डिजाइन क्षेत्रात काम करतात.
अशा विविध अभ्यासक्रमाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे विदेशातील नामांकित अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या आकडेवारीत वाढ होत आहे.






