फोटो सौजन्य - सोशल मीडिया
Career Options without Entrance Exam: नुकताच १२ वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.आता विद्यार्थ्यांमध्ये सर्वांत्तम कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्याकरिता स्पर्धा निर्माण होत आहे. सर्वच विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षण संस्थेत प्रवेश मिळवण्याकरिता प्रवेश परीक्षा (Entrance Exam) द्यावी लागते. परंतु, प्रत्येकाला या प्रवेश परीक्षेचा ताण हाताळता येतोच असे नाही. जर तुम्हालाही असे वाटत असेल की, तुम्ही प्रवेश परीक्षा देऊ शकणार नाही तर घाबरण्याचे काही कारण नाही. असे अनेक करिअर पर्याय उपलब्ध आहेत. ज्यामध्ये कोणत्याही प्रवेश परीक्षेशिवाय थेट प्रवेश मिळतो व उत्तम करिअर घडवता येते. तसेच चांगले पैसेही कमवता येतात.चला तर मग जाणून घेऊया करिअरच्या विविध क्षेत्रातील संधी…………….
सध्या डिजिटल मार्केटिंगला मोठी मागणी आहे. यामध्ये सोशल मीडिया मॅनेजमेंट, सोशल मिडियाच्या जाहिराती तयार करणे, सर्च इंजिन ऑप्टिमाइझेशन (SEO), कंटेट मार्केंटिंग यासारखी कौशल्ये शिकवली जातात. यासाठी ऑनलाइन सर्टिफिकेट कोर्सेस उपलब्ध असून या क्षेत्रात प्रगतीची मोठी संधी आहे.
सध्या सोशल मीडियाचा काळ ट्रेंडिंग व्हिडिओसाठी ओळखला जात आहे. ज्यांना नाविण्यपूर्ण आणि सर्जनशील कामात रस आहे. त्यांच्यासाठी हा पर्याय उत्तम आहे. फॅशन, ब्रँड आणि प्रॉडक्ट फोटोग्राफीपासून ते वेडिंग फोटोग्राफीपर्यंत या क्षेत्रात खूप स्कोप आहे.
तुम्ही नामांकित संस्थेत किंवा ऑनलाइन व्हिडिओ एडिटिंगचा कोर्स करू शकता. या कौशल्याची मार्केटमध्ये प्रचंड मागणी आहे. यामध्ये फ्रीलांन्सिंग किंवा फुल टाइम नोकरी करू शकता.
जर तुम्हाला लेखणाची आवड असेल तर कंटेट रायटिंग हे क्षेत्र तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. तसेच तुम्हाला परदेशी भाषा अवगत असतील तर ट्रांन्सलेशनच्या (भाषांतार) कामातही अनेक संधी आहेत.
अनेक ठिकाणी प्रवेश परीक्षेशिवाय हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातही प्रवेश मिळतो. या क्षेत्रात नोकरीसोबतच पदोन्नती आणि प्रगतीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.
एकंदरीत, हे सर्व कोर्सेस करियरच्या उत्तम संधी मिळवून देतातच, पण त्याबरोबर चांगले मानधन मिळवून देतात. तसेच जर तुम्हाला नोकरीबरोबर आणखी एक अर्थार्जनाचा मार्ग हवा असेल तर हे कोर्सेस तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट आहेत.






