फोटो सौजन्य - Social Media
इंडियन ऑईलमध्ये भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदे भरण्यात येणार आहेत.. ही भरती मार्केटिंग क्षेत्रात आयोजित केली असून टेक्निशियनच्या पदासाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तसेच ग्रॅज्युएट आणि ट्रेड अप्रेन्टिसच्या पदासाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी IOCL च्या iocl.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावे. विविध पदांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. इंडियन ऑइलमध्ये काम करू पाहणाऱ्या उमेदवारांनी या सुवर्ण भरतीला लाभ घेत अर्ज करण्याअगोदर जाहीर अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.
इंडियन ऑइलद्वारे आयोजित या भरतीच्या माध्यमातून ३८३ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवारांना फेब्रुवारीच्या १४ तारखेपर्यंत या भरतीतही अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना काही पात्रता निकषांना पात्र असावे लागणार आहे. हे पात्रता निकष शैक्षणिक आहेत तसेच उमेदवारांच्या वयोमर्यादेसंदर्भात आहेत. या भरतीसाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे निश्चित करण्यात आली आहे, म्हणजेच अर्जदाराचे वय किमान १८ वर्षांचे असणे आवश्यक आहे. तसेच जास्तीत जास्त २४ वर्षे वय असलेल्या उमेदवारांनाही या भरतीसाठी अर्ज करता येईल.
मात्र, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे, ज्यामुळे या प्रवर्गातील अधिक उमेदवारांना संधी मिळणार आहे. SC तसेच ST प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत जास्तीत जास्त ५ वर्षांपर्यंत सूट देण्यात आली आहे. OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत ३ वर्षांची सवलत देण्यात आली आहे. याशिवाय, PWD (शारीरिक अपंग) प्रवर्गातील उमेदवारांना विशेष सवलत दिली असून, ३४ वर्षे वय असलेले उमेदवारही या भरतीसाठी अर्ज करू शकतात. त्यामुळे सर्व प्रवर्गातील उमेदवारांना न्याय मिळावा आणि रोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण व्हाव्यात, असा या धोरणामागील उद्देश आहे.
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना NAPS किंवा NATS पोर्टलवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्ज केल्यानंतर पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. निवड झाल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी तसेच वैद्यकीय तंदुरुस्ती चाचणी प्रक्रियेत सहभागी व्हावे लागेल. विशेष म्हणजे, या भरती प्रक्रियेमध्ये कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. पात्रता आणि नोंदणीच्या आधारे थेट निवड प्रक्रिया पार पाडली जाईल. त्यामुळे पात्र उमेदवारांना निवड प्रक्रियेसाठी अनावश्यक अडथळे न येता, सुलभ व जलद पद्धतीने भरती होण्याची संधी मिळणार आहे. यामुळे रोजगाराची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सोपी बनवण्यात मदत होणार आहे.